ताज्या घडामोडीसामाजीक

लोकनेते स्व.रा.बा.कुंभारे यांची पुण्यतिथी साजरी

नागपूर,प्रतिनिधी :-

विणकरांचे पोलादी नेतृत्व व हलबा जमातीच्या आरक्षण चळवळीचे पुरस्कर्ते लोकनेते स्व.रा.बा.कुंभारे यांची पुण्यतीथी आज अस्तित्व क्रिएशन चे वतीने ऊत्साहात साजरी करण्यात आली.

विणकरांच्या चळवळीचे केंद्र राहिलेल्या गांधीबाग हँडलूम मार्केट येथील रा.बा.कुंभारेंच्या स्मृतिस्थळी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मेट्रोचे निवृत्त अधिकारी  गिरधारी पौनीकर यांचे हस्ते कुंभारे यांचे प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.याप्रसंगी ज्येश्ठ सामाजिक कार्यकर्ते,आदिम चे माजी संपादक व आदिम यूथ फाऊंडेशनचे संस्थापक सचिव श्री ओमप्रकाश पाठराबे यांनी स्व.रां बा.कुंभारे यांच्या संपूर्ण चळवळीवर सविस्तर प्रकाश टाकला व त्यांचा समाजसेवेचा आदर्श समाजाने व समाजात कार्यरत राजकिय नेत्यांनी अंगिकारण्याची गरज असल्याचे प्रतिपादीत केले.

शाम चांदेकर यांनीही त्यांच्या जीवनावर संक्षिप्त प्रकाश टाकला. संचालन अरविंद गडीकर प्रास्ताविक प्रदीप पौनीकर व आभार हरेश निमजे यांनी मानले.कार्यक्रमासाठी सर्वश्री किशोर ऊमरेडकर व अस्तित्व क्रिएशनच्या समस्त कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमात छाया खापेकर,भास्कर पराते,पुरूषोत्तम सेलूकर व चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker