कृषी व व्यापार

प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या प्रचार रथाचे उद्घाटन

गडचिरोली, ,प्रतिनिधी :-

प्रधानमंत्री पीक बीमा योजनेच्या प्रचार प्रसिध्दीसाठी जिल्ह्यात कृषी रथाला जिल्हाधिकारी संजय मीणा  यांच्या  मार्गदर्शनाखाली धनाजी पाटील अति. जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या हस्ते हिरवी झंडी दाखवून जनजागृती माहिमेचा शुभारंभ करण्यात आला. प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीब/रब्बी हंगाम २०२२ मध्ये राबवण्यासाठी शासनाने मान्यता दिलेली आहे. सदर योजना शासन भारतीय कृषी बीमा कंपनीच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. पीक विमा भरण्याची अंतीम तारीख ३१ जुलै २०२२ आहे.

सदर योजने बाबत व्यापक जनजागृती करण्यासाठी २६ ते ३१ जुलै या कालावधीत कृषीरथाव्दारे तालुका स्तरावरील विमा कंपनीचे तालुका प्रतिनिधी व कृषी विभागाचे क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी विमा योजनेबाबत विस्तृत मार्गदर्शन करणार आहेत, जेनेकरून अधिसूचित ठिकाणचे हवमान घटकांचा प्रतिकूल परिस्थिमूळे नूकसान झाल्यास शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळू शकणार आहे.

 

सदर कृषी रथाला मंगळवारला जिल्हा स्तरावर हिरवी झंडी दाखवून व्यापक जनजागृती करण्याचे आवाहन संजय मीना जिल्हाधिकारी, धनाजी पाटील अति. जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी केले आहे. 

या प्रसंगी समाधान शेंडगे निवासी उपजिल्हाधिकारी, बसावराज मस्तोळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, संदीप कराळे प्रकल्प संचालक आत्मा, अरुण वसवाडे कृषी उपसंचालक, प्रदिप वाहणे तालुका कृषी अधिकारी गडचिरोली, गणेश बादाळे जिल्हा मृदा सर्वेक्षण अधिकारी, शितल खोबरागडे तंत्रअधिकारी सांख्यिकी, डोनाडकर मोहिम अधिकारी जि.प. गडचिरोली, राकेश बायलालवार जिल्हा समन्वयक, राहुल नंदनवार तालुका समन्वयक, शुभम दुधबळे तालुका समन्वयक भारतीय कृषी विमा कंपनी आदी उपस्थिती होते.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker