राजकीय

वंचित चे इंदिरा चौकात फ्रि स्विमींगकरीता नागरीकांना आवाहन

गडचिरोली,प्रतिनिधी :-

           गडचिरोली शहराचा हृदय असलेल्या ईंदिरा गांधी चौकातील रस्त्याची ऐसीतैसी झाली असतांना सुध्दा लोकप्रतिनीधी व प्रशासनाचे अधिकारी कानाडोळा करीत असल्याचा आरोप करून प्रशासनाच्या अधिका-यांचा व लोकप्रतिनींचा वंचित बहुजन आघाडीने निषेध करून फ्रि स्विमींग आंदोलन केले.

    ईंदिरा गांधी चौकातील तलावात  फ्रि स्विमींग करीता नगर परिषद मुख्याधिकारी व राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता यांच्याशी शहरवासियांनी संपर्क साधावा असेही आवाहन करण्यात आले.

        या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे, जिल्हा महासचिव योगेंद्र बांगरे, उपाध्यक्ष जी के बारसिंगे, बाशिद शेख, जावेद शेख, दिलीप बांबोळे, प्रफुल मेश्राम, भारत रायपूरे, संदिप सहारे आदि सहित  कार्यकर्ते मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

         उपरोक्त आंदोलन प्रशासनाचे व लोकप्रतिनीधीचे लक्ष वेधण्यासाठी करण्यात आले. गेल्या एक महिण्यापासून ईंदिरा गांधी चौकातील मुख्य रस्त्यावर  स्विमींग तलावासारखे पाणी साचून मोठमोठे खड्डे पडले आहेत त्यामूळे  ये – जा करणा-यांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे, तसेच शाळकरी मुलांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. चिखलाने माखलेले पाणी वाहनामूळे शाळकरी मुलांच्या व ईतरी पायदळ  चालणा-या नागरिकांच्या अंगावर उडत आहे. दिवसभर चामोर्शी रस्तावरची ट्राफीक जाम होऊन चौकाच्या चारही रस्त्याची  ट्राफिक वेळोवेळी जाम होत आहे,गेल्या दोन वर्षापासून चामोर्शी रोडचे पक्क्या रस्त्याचे काम चालू असून अजूनह पूर्ण झाले नाही याला प्रशासन व लोकप्रतिनिधी जबाबदार असल्याचा आरोपही बाळू टेंभुर्णे यांनी केला आहे. रस्त्याची झालेली ऐसीतैसी  हे  सर्व  प्रशासनातील अधिकारी व लोकप्रिनीधी  उघड्या डोळ्याने बघून सुद्धा आंधळेपणाचा आव आणत आहेत त्यामूळे त्यांचे चिपळलेले डोळे उघडण्यासाठी प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले.

       वंचित बहुजन आघाडीने केलेल्या फ्रि स्विमींग या प्रिकात्मक आंदोलनाची दखल प्रशासनाने घेऊन रस्ते व फुटलेली पाईप लाईन तात्काळ दुरूस्त करावे अन्यथा शहरवासियांची गैरसोय खपवून घेतल्या जाणार नाही असेही टेंभुर्णे यांनी म्हटले.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.