कृषी व व्यापार

गडचिरोलीतील जे.बी. रोडलाईन्सचे ट्रक हटवा

गडचिरोली,प्रतिनिधी :-

शहरातील चंद्रपूर मार्गावरील नेहरू नगर परिषद च्या संकुलात सुरु असलेले ट्रान्सपोर्ट चे कार्यालय हटविण्यात यावे अशी मागणी याच संकुलातील व्यापारी यांनी केली आहे. या ट्रान्सपोर्ट चे  ट्रक रोडवर साहीत्य चढविणे व खाली करीत असल्याने वाहतूकीची मोठी कोंडी निर्माण होत असते तसेच  इथे नेहमीच अपघात होत असतात. हे विशेष. 

आठवडी बाजार येथील नेहरु संकुल सेथे जे.बी. रोडलाईन्सचे ट्रक रोडवरसाहीत्य खाली करीत असल्याने वाहतूकीची कोंडी सोडविण्याबाबत चक्क व्यावसाईकानी पोलीस स्टेशन मध्ये धाव घेतली आहे.

आठवडी बाजार नेहरु संकुल येथे भाडे तत्वावर गाळे किरायाने घेवून बरेचशे व्यवसाईक आपले व्यवसाय करीत आहेत व त्याच संकुल मध्ये जे. बी. रोडलाईन्सचा गॅरेज आहे. सदर रोडलाईन्सचे ट्रक दिवसभर रोडवर उभे राहून ट्रान्सपोर्टने आलेले साहीत्य खाली करीत असतात व ट्रकमधील साहीत्य शहरात वाहून नेण्याकरीता दुसरे पण लहान गाड्या, हातगाड्या,उभ्या राहतात. त्यामुळे वाहतूकीची कोंडी होवून भविष्यात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तसेच सदर गॅरेजचे वाहन दिवसभर रोडवर साहीत्य उतरविण्याचे काम करीत असल्याने व उभ्याट्रकमुळे या संकुलातील दुकान दिसत नाही, त्यामुळे येथील व्यवसायावर सुद्धा परिणाम झालेला आहे. त्यामुळे आम्हाला त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

जे.बी. रोडनाईन्सचे येणारे ट्रक मधील साहीत्य इतर ठिकाणी खाली करण्यास यावे व वाहतूकीची होणारी कोंडी व आम्हा व्यवसाईकांना होणारा त्रास थांबविण्यात यावे, अशी मागणी क्रिष्णा कोल्डींक्स, गडचिरोली, आर. के. केमीकल्स अॅन्ड हार्डवेअर, गडचिरोली, म्हस्के बुक डेपो, गडचिरोली,आंबोरकर सायकल स्टोर्स, गडचिरोली,सिनेक्स मेन्स वेअर, गडचिरोली चे संचालक संजय बारसागडे,नृपेश नदानकर,प्रफुल्ल आंबोरकर,किरण म्हस्के,यांनी लेखी तक्रार पोलीस स्टेशन ला दिली आहे. याबाबत पोलीस प्रशासन कोणती कारवाई करते या कडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.