आपला जिल्हा

वसंत विद्यालयातील विद्यार्थ्यावर एस.टी. महिला वाहकाने केली मारहाण

गडचिरोली बसस्थानकातील प्रकार; CCTV तपासून योग्य ती कारवाई होणार – एस.टी. प्रशासन

गडचिरोली,प्रतिनिधी :-

गडचिरोली येथील वसंत विद्यालयात शिकणाऱ्या १६ वर्षीय विद्यार्थ्याला एस.टी. महामंडळाच्या महिला वाहकाकडून झालेल्या मारहाणीचा प्रकार मंगळवारी दुपारी ४.४५ वाजता समोर आला आहे. विद्यार्थ्याचे नाव तन्मय सोमेश्वर भरडकर असे असून, हा प्रकार बस स्थानकातील फलाट क्रमांक १ वर घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, MH 40 Y 5762 क्रमांकाची एस.टी. बस पोटेगाव परिसरातील प्रवाशांना सोडून चंद्रपूरकडे रवाना होण्यासाठी फलाट क्रमांक १ वर उभी होती. याच दरम्यान, तन्मय हा विद्यार्थी बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करीत असताना, बसमधील महिला वाहक कला शिडाम यांनी “कशाला एवढी घाई करतोस?” असे म्हणत त्याला कानशिलात मारल्याचा आरोप आहे. तसेच, “ही बस तुझ्या घरीची संपत्ती आहे काय?” अशा शब्दांत उद्धट भाषा वापरण्यात आल्याची माहिती मिळाली.

या प्रकारामुळे विद्यार्थी घाबरून गेला आणि बसमध्ये चढण्याऐवजी थांबला. त्यानंतर त्याने घरी जाऊन भावाला झालेला प्रकार सांगितला. भावाने घटनास्थळी जाऊन वाहकाकडे विचारणा केली असता, त्यालाही उद्धट उत्तर देत, “ही काय तुमच्या घरची बस आहे का?” अशी प्रतिक्रिया दिली गेली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी दिली आहे.

पीडित विद्यार्थी तन्मय भरडकर याने संबंधित प्रकाराबाबत तक्रार नोंदवली असून, बस स्थानकावरील तक्रार नोंद वहीत महिला वाहकांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या संदर्भात संपर्क केला असता एस.टी.चे जिल्हा नियंत्रक अशोक वाढीभस्मे यांनी सांगितले की, “घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून, बसस्थानकावरील CCTV फुटेज तपासले जात आहे. दोषी आढळल्यास महिला वाहकावर आवश्यक ती कारवाई करण्यात येईल.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker