देश विदेश
२६/११ च्या हल्ल्यातील शहिदांना राज्यपाल, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची मानवंदना

मुंबई,विशेष प्रतिनिधी :-
मुंबईवरील २६ नोव्हेंबर २००८ च्या दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला करताना शहिद झालेल्या मुंबई पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी तसेच सुरक्षा दलातील वीरांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानवंदना दिली. तसेच त्यांच्या स्मृतीस्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी सर्व मान्यवरांनी तसेच गणवेशातील अधिकारी व पोलीस जवानांनी हुतात्म्यांना सलामी दिली.




