क्राईम

सिनेस्टाईल पाठलाग करुन पकडली १७,८१,६०० रु. ची दारु

गडचिरोली,प्रतिनिधी :-

अवैद्य दारु विक्री विरोधात गडचिरोली पोलीस दलाची मोठी कारवाई करीत १७,८१,६०० रु. ची दारु जप्त केली आहे

काल स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर चामोर्शी हद्दीतील दारु तस्कर शंकर अन्ना हा त्याचे सहका-यांच्या मार्फतीने चंद्रपुर जिल्हयातुन मोठया प्रमाणात दारुची खेप आणणार आहे. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखा येथील अधिकारी व कर्मचारी यांनी हरणघाट मार्गावर रात्री सापळा रचुन नाकाबंदी लावली असता दारुचे वाहतुक असलेल्या पिक अपवॅनने पोलीसांच्या इशा- यास न जुमानता बॅरिकेटस तोडुन पळ काढला. परंतु पोलीसांनी क्षणाचा विलंब न करता त्या वाहनाचा पाठलाग सुरु केला.

अवैध दारु वाहतुक करीत असलेल्या वाहन चालकाने कारवाई टाळण्याकरीता त्याचे ताब्यातील वाहन जंगल मार्गाने तसेच पोस्टे चामोर्शी व पोस्टे आष्टी येथील वेगवेगळया गावात नेले. परंतु पोलीसांनी १०० ते १२५ किमी सतत पाठलाग केल्याने वाहनचालक व त्याच्या साथीदाराने वाहन पोस्टे चामोर्शी हद्दीतील सोनापुर या गावाजवळ सोडुन पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलीसांनी त्यांचा पाठलाग करुन वाहनचालका सोबत असलेल्या अमित बारई रा. गौरीपुर ता. चामोर्शी यांस ताब्यात घेतले परंतु वाहनचालक राकेश मशीद रा. गौरीपुर ता. चामोर्शी अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरुन फरार झाला. 

सदर वाहनात देशी दारुच्या १३९ पेट्या व वदेशी दारुच्या ५ पेटया सापडल्याने  पोलीसांनी सदर दारुचा मुद्देमाल व वाहतुकीकरीता वापरलेले पिकअप वाहन असे १७,८१,६००/- रुपयांचा मुद्देमाल कारवाई करुन जप्त केला.

संबंधीत घटनेच्या अनुषंगाने पोस्टे चामोर्शी येथे दिलेल्या तक्रारीवरुन कलम ३५३ भादंवि सहकलम ६५ (अ), ९८ ( २ ), ८३ मदाका सहकलम १८४ मोवाका अन्वये आरोपी नामे शंकर अन्ना रॉय, राकेश मशीद व अमीत बारई यांचे विरुध्द गुन्हा नोंद करुन आरोपी नामे अमीत बारई यांस अटक करण्यात आली आहे.

गडचिरोली येथील पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि. राहुल आव्हाड, पोउपनि दिपक कुंभारे, नापोअं अकबर पोयाम, पोअं प्रशांत गरफडे, श्रीकांत बोईना, श्रीकृष्ण परचाके, मंगेश राऊत, सुनिल पुट्ठावार, सचिन घुबडे, चानापोअं मनोहर येलम, शगीर शेख यांनी केलेली आहे.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.