सामाजीक

अध्यक्षपदी  नागसेन उंदिरवाडे तर मानद सचिवपदी  प्रशांत मडावी यांची निवड

 गडचिरोली जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभाग कर्मचारी सहकारी पतसंस्था

गडचिरोली,प्रतिनिधी :-

 गडचिरोली जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभाग कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या.गडचिरोली र.नं.109 या पतसंस्थेतील नवनिर्वाचित संचालक मंडळाव्दारे पतसंस्थेतील नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.अध्यक्षपदी  नागसेन उंदिरवाडे तर मानद सचिवपदी  प्रशांत मडावी यांची निवड झाली आहे. 

सर्व संचालक आणि पदाधिकारी यांची आज दिनांक 30.03.2023 रोजी खांडरे, सहायक निवडणुक निर्णय अधिकारी तथा सहायक निबंधक सहकारी संस्था, गडचिरोली यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली.

  1. श्री नागसेन उंदिरवाडे अध्यक्ष 2. श्री प्रशांत मडावी मानद सचिव 3 श्री संदिप – तागडे उपाध्यक्ष4. श्री जयराम मिश्रा खजिनदार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

या प्रसंगी संचालक मंडळाद्वारे नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे अभिनंदन करण्यात आले

व पतसंस्थेच्या पुढील वाटचालीकरीता सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच संचालक मंडळाद्वारे व्हि.एस.पाटील, प्रशासक तथा सहायक निबंधक सहकारी संस्था, गडचिरोली यांनी सुमारे दोन वर्षापासून पतसंस्थेचे कामकाज उत्तमरित्या सांभाळल्याबाबत अभिनंदन करण्यात आले.

या वेळी जेष्ठ सदस्य मनीष नारनवरे यांनी नवनियुक्त पदाधिकारी आणि संचालक यांचे अभिनंदन केले.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker