गडचिरोली,प्रतिनिधी :-
गडचिरोली नगर प्रशासनाने शहरात प्रस्ताविक गतिरोधक (स्पीड बेकर) लवकरात लवकर तयार करण्यासाठी कार्यकारी अभियंता विवेक मिश्रा, राष्ट्रीय महामार्ग विभाग गडचिरोली यांना नागरिकांनी निवेदन देऊन केली आहे. गडचिरोली शहरात राष्ट्रीय महामार्गाचे काम झाल्यापासून प्रचंड प्रमाणात अपघात होत असून यात अनेक विद्यार्थी सह अनेक व्यक्ती व जनावरेही जखमी होत असून अनेकांना जीव गमवावा लागला आहे.
गडचिरोलीतील राष्ट्रीय महामार्गाने शहर वासियांना मृत्यू चा दारात उभा केलेला असून या महामार्गावर नागरिकांना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे. शहरातील बहुतेक सर्वच चौकात रस्त्याला जोडणारे मार्ग व वळण असल्याने येथे दिवसा आणि रात्रीचे वेळेस खाजगी बस व ट्रकसह ईतर वाहने रस्त्याच्या दोन्ही बाजूने भरधाव वेगाने जात असल्यांमुळे अनेक अपघात होत आहेत. अनेकांना जीव गमवावा लागत आहे.
अपघातानंतर या भागात वाहतुकीची नेहमीच कोंडी निर्माण होऊन वाहतुकीस अडथळे निर्माण होत असते. इथे रुग्णांना नेहमी रुग्णवाहिकेतून नेतांना या मार्गातून, मार्ग काढण्यास तारेवरची कसरत करावी लागते. शहर परिसरात किरकोळ व गंभीर स्वरूपाचे अपघात अद्यापही रोज होत आहेत.
दिनांक १ मे २०२३ ला या चौकात एकवीस वर्षीय विद्यार्थी विकास बोगा,रा.गोडलवाही ता. धानोरा याचा भीषण अपघातात मृत्यू झाला आहे.
या राष्ट्रीय महामार्गावरील नालीवर अनेक दुकानदारांनी दुकाने थाटले आहे.त्यावरील अतिक्रमण काढण्यात आले आहे. तरी सुद्धा नालीवर दुकान सुरु करण्यात आले आहे.या मुळे नागरिकांना चालताना परत त्रास सहन करावे लागत आहे. सदर महामार्गावरील दुकाने हटविण्यात यावे. सुरळीत रहदारी सुरु करावी. या मार्गावर सिग्नल सुरु करावे.तसेच तत्काळ गतिरोधक (स्पीड बेकर) लावण्यात यावे अशीही मागणी करण्यात आली आहे.
या शहर व ग्रामीण परिसरातील व शहरातील पुरुष-महिला आणि बच्चे कंपनी हे नेहमी सकाळी आणि रात्री व्यायाम साठी फिरायला जात असतात. वाहने रस्त्यावर भरधाव जात असल्याने भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनामुळे यांना जीव मुठीत धरून रस्त्यावरून चालावे लागते.
दिनांक १ जून २०२३ पासून शालेय शैक्षणिक वर्ष सुरु होत आहे. या मार्गावरून रोज हजारो विद्यार्थी हे शाळेत पायदळ आणि सायकलने शाळेत ये-जात असतात. या वाहनामुळे येथे त्यांच्या जीवाला गंभीर मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. या मार्गावर नेहमीच अपघात होत आहेत.
मुख्याधिकारी, नगर परिषद,गडचिरोली यांनी शहरातील दहा ठिकाणी सुचविलेल्या ठिकाणी गतिरोधक बांधकाम त्वरित करावे. अशी मागणी कारगील चौक येथील उदय धकाते,नंदू कुमरे,राजू पुंडलिकर,प्रफुल्ल आंबोरकर,सुनील देशमुख,नरेंद्र चन्नावार,अजय पवार तसेच परिसरातील नागरिकांनी केली आहे.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन
Back to top button