आरोग्य व शिक्षण

आज ३६ वर्षांनी भेटतील मित्र-मैत्रिणी गडचिरोलीत

गडचिरोली,प्रतिनिधी :-

गडचिरोलीमध्ये ४५ वर्षापूर्वी झालेली मैत्री १० वर्ष पर्यंत टिकली नंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी  अलग झालेले ५० च्या वर मित्र-मैत्रिणी तब्बल ३६ वर्षा नंतर आज गडचिरोली शहरात एकत्र येत आहे. हा अभूतपूर्ण क्षण आज शहरवासियांना अनुभवास येणार आहे.

५१-५२ वर्षापूर्वी जन्माला आलेले हे मित्र इयता १ ली पासून १० वी पर्यंत एकत्र शिक्षण गडचिरोली येथे घेतले होते. ५ वी ते १० चे शिक्षण हे जुन्या काळातील प्रसिद्ध गवर्नमेंट हायस्कूल आताची जिल्हा परिषद हायस्कूल गडचिरोली येथे घेतले. या शाळेत त्या काळात शिक्षण घेणे प्रत्येक विद्यार्थिचे स्वप्न असायचे, याच शाळेत १९८६-८७ पर्यंत शिक्षण घेतलेले ८० पैकी ६० विद्यार्थी हे २८ मे २०२३ ला मित्रोत्सव-१९८६-८७ साजरा करण्यासाठी गुजरात,मध्यप्रदेश,छतीसगड,मुंबई,पुणे नागपूर आदी ठिकाणाहून  एकत्र येत आहेत.सदर कार्यक्रम जिल्हा परिषद हायस्कूल गडचिरोली सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत होणार आहे.

शालेय जीवनातील जिगरी मित्र-मैत्रिणी या उच्च शिक्षणासाठी अलग अलग क्षेत्रात शिक्षण घेण्यासाठी गेले.परंतु कोण कोणत्या पदावर गेलेत.याची मी नेहमी माहिती घेत असल्याने ३६ वर्षांनी त्यांचेशी संपर्क करून सर्वाना एकत्र करीत आहोत.आज आम्ही सर्व मित्र-मैत्रिणी एकत्र येत आहोत, हा जीवनातील सर्वात मोठा आनंद सर्व  मित्रांना होत आहे.

-उदय धकाते,वर्गनायक,१९८०-८१  ते  १९८६-८७

सदर यातील विद्यार्थी हे उच्च शिक्षण घेतले असून काही शास्त्रज्ञ,डॉक्टर,प्राध्यापक,शिक्षक-शिक्षिका,उच्च पदावर पोलीस अधिकारी,वन अधिकारी,वैद्यकीय विभागात कार्यरत आहेत. हे  सर्व विद्यार्थी २८ मे २०२३ ला शाळेत आयोजित मित्रोत्सव-१९८६-८७ या विशेष कार्यक्रमला येत आहेत. या वेळी त्या काळातील वर्ग शिक्षक-शिक्षिका यांना सुद्धा या कार्यक्रमाला विशेष निमंत्रित केले आहेत. यासाठी मागील तीन महिन्यापासून गडचिरोली येथील मित्र मैत्रिणी हे नियोजन करण्यासाठी अथक परिश्रम करीत आहे.जे विदयार्थी संपर्कात आले नाही त्यांनी उपस्थित राहावे.

वर्गनायक उदय धकाते यांच्या मार्गदर्शनात निमेश पटेल,उल्हास बाटवे,डॉ.सुरेश पेंदाम,प्रा.धर्मेंद्र मुनघाटे,मनोज चन्नावार,सुनील पेंदोरकर,नितीन भडंगे,रवी सूर्यवंशी,सुरेश आंबुलकर,गीता मंगरे-ठाकरे, अनुसया बावणे-डोंगरवार,सुलभा जांभुळे-नारनवरे,गीता गुरुनुले-लेनगुरे, देवेंद्र सज्जनपवार,प्रकाश पंधरे,किशोर कत्रोजवार आदी मित्र मंडळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक प्रयत्न करीत आहेत.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.