ताज्या घडामोडी
पत्रकार उदय धकाते आणि व्यंकटेश दुडमवार यांची निवड

गडचिरोली, प्रतिनिधी :-
सोशल मीडियातून सर्वात जलदगतीने बातम्या प्रकाशित करणारी गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशन जिल्हा संयोजकपदी महाभारत न्यूजचे संपादक उदय धकाते आणि आज तक चे पत्रकार व्यंकटेश दुडमवार यांची निवड करण्यात आली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील समस्या, अन्याय, अत्याचार सामाजिक, राजकीय धार्मिक व इतर घडामोडी ची बितबातमी लाखो वाचकापुढे न्यूज पोर्टल व यु ट्यूब आणि न्यूज चॅनेल च्या माध्यमाने पोहचवून देण्याचे काम गेले तीन वर्षापासून करीत आहे. गामा ची स्थापना तीन वर्षा पूर्वी करण्यात आली.

गामाच्या माध्यमाने अनेक सामाजिक, राजकीय, धार्मिक, अत्याचार पीडित्यांचे पत्रकार परिषद आयोजित करण्यात येते. पत्रकार परिषदच्या माध्यमाने लाखो वाचक आणि प्रशासनाला जागे करण्याचे कार्य करीत आहे.जेथे वृतपत्र पोहचू शकत नाही तिथे सोशल मीडिया च्या माध्यमातून नागरिकांना बातम्या सर्वात अगोदर पोहचविण्याचे काम गामा चे पत्रकार करतात. या मुळे गामा ही पत्रकारांची संस्था जिल्ह्यात नावलौकिक प्राप्त केलं आहे.
पत्रकार परिषदांसाठी संपर्क
¶¶¶
१)उदय धकाते (९४२३४२२३२३)
२)व्यंकटेश दुडमवार (९४२२६२४४६६)
यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशन “गामा” च्या वतीने करण्यात आले आहे.
२९ डिसेंबर २४ ला गामाची नवीन कार्यकारिणी ची निवड करण्यात आली या वेळी नवीन सात पत्रकारांची नवीन नोंदणी करण्यात आली.




