आरोग्य व शिक्षण
३६ वर्षांनी भेटलेल्या मित्र-मैत्रिणीचा आनंद गगनात मावेना ….

गडचिरोली,प्रतिनिधी :-
गडचिरोली शहरात तब्बल ३६ वर्षांनी ५० च्या वर मित्र-मैत्रिणी एकत्र आल्याने त्यांचा आनंद गगनात मावेना असा अभूतपूर्ण क्षण काल अनुवाभवास आला. प्रत्येक भेटीचा आयुष्यातून गेलेला क्षण त्यांनी आपल्या हृदयात साठून ठेवलेला होता तो कधीच परत येणार नाही असे वाटत असताना त्यांना तोच अनुभव आणि क्षण आणण्याच काम त्यांचे वर्गनायक उदय धकाते यांनी आयोजित केलेल्या मित्रोत्सव-१९८६-८७ हा अभूतपूर्ण अविस्मरणीय कार्यक्रम गडचिरोली वासियांनी अनुभवला.
गडचिरोलीमध्ये ४५ वर्षापूर्वी झालेली मैत्री १० वर्ष पर्यंत टिकली नंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी अलग झालेले ५० च्या वर मित्र-मैत्रिणी तब्बल ३६ वर्षा नंतर आज गडचिरोली शहरात एकत्र आले. हा अभूतपूर्ण क्षण आज शहरवासियांना अनुभवास आला आहे.
अत्यंत नियोजित पूर्व या कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त शिक्षिका श्रीमती लीलाबाई पेंदाम,माजी उपशिक्षणाधिकारी राजनहीरे, सेवानिवृत्त शिक्षक आयलावर,सेवानिवृत्त शिपाई श्रीमती गाठे बाई, सेवानिवृत्त शिपाई जुनघरे, जिल्हा परिषद हायस्कूल चे मुख्याध्यापक चंदनगीरीवार,वर्गनायक उदय धकाते यांची उपस्थिती होती. सर्वप्रथम सरस्वती व दीप पूजन सेवानिवृत्त जेष्ठ शिक्षिका श्रीमती लीलाबाई पेंदाम यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी जिल्हा परिषद हायस्कूल गडचिरोलीचे सभागृह रांगोळी आणि फुलांनी सजविण्यात आले होते,हे विशेष.मित्र-मैत्रिणींचा सुंदर परिचय चा कार्यक्रम घेण्यात आला.प्रत्येकास स्मृतीचिन्ह भेट देण्यात आले. जुन्या काळातील शिक्षक-शिक्षिका,चपराशी यांना भेटून माजी विद्यार्थी हे आनंदित झाले. विद्यार्थी सेवानिवृत्त शिक्षिका व चपराशी हे या शाळेतील ३६ वर्षाच्या भेटीने गहिवरले.



