अमरावती, प्रतिनिधी :-
अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन पंत बोथे यांना यावर्षीचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
८७ वर्षीय बोथे यांनी गेल्या आठ दशकांपासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेत समाजप्रबोधनाचे कार्य केले आहे. व्यसनमुक्ती, ग्रामस्वच्छता, सामूहिक प्रार्थना तसेच नैतिक मूल्यांची जोपासना या माध्यमातून त्यांनी समाजात परिवर्तन घडवून आणले.
यासोबतच अनेक अनाथ, निराधार व गरीब मुलांच्या शिक्षण व संगोपनाची जबाबदारी स्वीकारून त्यांनी असंख्य जीवन घडवली आहेत. तुकडोजी महाराजांची कर्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुरुकुंज मोजरी येथे केलेल्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत केंद्र सरकारकडून त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
Back to top button