महाराष्ट्र

स्थानिक दुकानदार कडून खरेदी करा- ग्राहक पंचायत चे आवाहन

गडचिरोली,प्रतिनिधी :-

दिवाळी च्या सण मोठ्या प्रमाणात सर्वत्र साजरा करण्यात येत आहे.यामुळे नागरिक दिवाळी साजरी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वस्तूची खरेदी हि स्थानिक दुकानदार यांच्याच कडून करावी आनलाईन  करू नये असे आवाहन अखिल भारतीय गाहक पंचायत गडचिरोली ने केले आहे.

भारतीय सण हे मोठ्या प्रमाणात सर्वत्र साजरे होत असतात. मागील काही वर्षा पासून अनेक बहुराष्ट्रीय कंपनी या अनेक उत्पादने हे आनलाईन करण्यास नागरिकांना आमिष दाखवून करीत असतात. यात  अनेक ग्राहकांची फसवणूक होत आहे. या बाबत अनेक तक्रारी प्राप्त होत असून नागरिकांनी अश्या प्रलोभनाला बळी न पडता आपल्या नजीकच्या स्थानिक दुकानातूनच खरेदी करावी आणि पक्के बिल घ्यावे.जेणे करून दुकानदार आणि ग्राहकयांचा दृढ विश्वास कायम राहून फसवणूक टाळता येते.

गडचिरोली जिल्ह्यातील ज्या दुकानदार किंवा व्यापारी नियम बाह्य विक्री करून फसवणूक किंवा ग्राहकसोबत गैरवर्तुणूक करीत असेल त्यांची तक्रार आमच्या कडे करावे

-उदय धकाते,जिल्हा सचिव,

अखिल भारतीय गाहक पंचायत गडचिरोली.

ग्राहकांनी खरेदी काही वस्तू हे विकत घेताना पकेजिंग आणि मुदत तारीख पाहून खरेदी करावी.पदार्थ घेतांना रेड आणि ग्रीन हॉलमार्क बघावे, रेड हे मांसाहारी आणि  ग्रीन हे शाकाहारी चे असते हे पाहूनच खरेदी खात्रीपूर्वक करावी.तसेच त्यांचे अन्न व औषध प्रशासनाची मंजुरी असल्याची सुद्धा खात्री करावी. असे आवाहन जिल्हा अध्यक्ष चंद्रकात पतरंगे, जिल्हा सचिव उदय धकाते, संघटन मंत्री विजय कोतपल्लीवार, मार्गदर्शक प्रकाश पाठक, सदस्य अरुणराव पोगळे यांनी केले आहे.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.