महाराष्ट्र

राज्य शिक्षकेतर महामंडळ सर्वोश्रेष्ठ शिवाजीराव खांडेकर यांचे नेतृत्वाखाली विजयी

पुणे प्रतिनिधी :-

राज्याचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षकेत्तर सेवक महामंडळ त्रेवार्षिक निवडणुकीत राज्य अध्यक्ष पदी अनिल माने, राज्य सरकार्यवाहक शिवाजी खांडेकर, तर कार्याध्यक्षपदी मोरेश्वर वासेकर अविरोध निवडणून आले.एकूण १७ पैकी १३ पदाधिकारी हे अविरोध निवडून आले असून चार पदाची निवडणूक मतदानाने घेण्यात आली.

राज्यातील सर्व खाजगी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकेत्तर सेवकांचे एकमेव ही संघटना मागील ५० वर्षा पासून शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यावरील अन्याय व समस्याचे शासन दरबारी न्याय मागण्याचे काम करीत आहे.

आज पुणे येथे साने गुरुजी स्मारक राष्ट्रसेवादल येथे निवडणूक प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात शांततेत पार पडली. या वेळी राज्य भरातून ५०० सभासद उपस्थित होते.

अनिल माने, शिवाजी खांडेकर, मोरेश्वर वासेकर  यांचे सह १४ पदाधिकारी हे अविरोध निवडून आले. तीन जागेसाठी मतदान झाले. यावेळी यात सुद्धा खांडेकर पुरस्कृत उमेदवार निवडून आले. ही निवडणूक कडे राज्याचे लक्ष वेधून घेतली होती. हे विशेष.

राज्यातील अनेक शिक्षकेत्तर यांना न्याय मिळवून देण्याचं काम हे महामंडळ मागील ५० वर्षा पासून करीत आहे. मृत्यू पावलेले शिक्षकेत्तर यांच्या वारसाना अनुकंपा मध्ये सेवेत घेण्यासाठी दीर्घ लढा दिला असून राज्यातील अनेक शाळेत वारसाना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यात येत आहे.

निवडून आलेले  पदाधिकारी पुढील प्रमाणे आहे.

महाराष्ट्र माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटना महामंडळाच्या राज्य सरकार्यवाहपदी शिवाजीराव खांडेकर यांची बिनविरोध निवड तसेच राज्य महामंडळाच्या अध्यक्षपदी अनिल माने,कार्याध्यक्ष  मोरेश्वर वासेकर,उपाध्यक्ष – रवि गवळी,महिला उपाध्यक्षा – सौ.सरिता कुलकर्णी,सौ.प्रिया पवार, विभागीय कार्यवाह, मुंबई – देविदास  पंडागळे,पुणे विभाग –  गोवर्धन पांडुळे,कोल्हापुर विभाग -गजानन नानचे,लातुर विभाग – राजेश्वर  चापोले,नागपुर विभाग – जिवनदास सार्वै, अमरावती विभाग -विजय ताले,प्रसिद्धी प्रमुख रामचंद्र केळकर,अंतर्गत हिशेबनीस श्रीधर गोंधळी,उपाध्यक्ष श्रीधर जयवंत गोंधळी,खैरुद्दिन सय्यद,द्यानेश्वर महाले हे विजयी झाले.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.