सामाजीक

३३ वर्षांनी भेटले वर्ग मित्र मैत्रिणी …

गडचिरोली,प्रतिनिधी :-

विद्यालयाचे दिवस संपले की प्रत्येकजण आपल्या करियरसाठी वेगवेगळ्या क्षेत्राकडे धाव घेतो. मात्र ज्या विद्यालयात आपण शिकलो, घडलो, वेगवेगळ्या भागातील विद्यार्थ्यांबरोबर आपण मैत्रीचे नाते जोडले, ती नाळ मात्र तशीच असते. पुन्हा एकदा भेटावे, सर्वांसोबत हितगुज करावे असे सर्वांनाच वाटते. पण प्रत्येकजणच आपआपल्या नोकरी-धंद्यात, संसारात व्यस्त असल्यामुळे ते सहजासहजी शक्य होत नाही. मात्र अशक्यही नसते, ज्या विद्यालयात आपण घडलो, आयुष्य जगण्याचे तंत्र-मंत्र मिळाले, त्या विद्यालयातील पुन्हा एकदा त्याच विद्यार्थी मित्र- मैत्रिणीं सोबत पुन्हा 33 वर्षानंतर भेटण्याची संधी चालून आली. ती म्हणजे या स्नेह मिलन सोहळ्यामुळे

मागील दीड वर्षांपासून धर्मराव कृषी विद्यालयातील सन 1990-91 तुकडीतील मित्र – मैत्रिणींचा “ध.कृ.वि. बालक व बालीका” या नावाने व्हाट्स अँप ग्रुप मधून एकमेकांशी संपर्क येत होता अशातच सर्वांनी एकत्र येऊन कुठेतरी भेटून शाळेतील आठवणींना उजाळा द्यावा अशी इच्छा व्यक्त केली. त्याला सर्व मित्र- मैत्रिणींनी सकारात्मक प्रतिसाद देत गडचिरोली येथील आरमोरी रोडवरील निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या देशमुख लॉन मध्ये भेटण्याची योजना आखून स्नेहमिलन सोहळा आयोजित करण्यात आला.

आज दिनांक 28 जानेवरी 2024 अखेर तो दिवस उजळला  हळूहळू सर्व मित्र-मैत्रिणी एकत्र गोळा झाल्यानंतर प्रत्येकाने आपली ओळख करून दिली. धर्मराव कृषी विद्यालयातील 40 हुन अधिक विद्यार्थी, माजी वर्गमित्र इतक्या वर्षानंतरही पहिल्या भेटीत शाळेतील ते चेहरे आठवित होते. व हळुहळु सर्वांनी एकमेकांशी मनमुराद गप्पा करून नव्या-जुन्या आठवणींना उजाळा देत एकमेकांच्या परिवारा_ विषयी, कामकाजाविषयी व सध्या आपल्या आयुष्यात काय चालल आहे हे एकमेकांना सांगतांना गप्पा रंगत गेल्या.

1990-91 च्या बॅचचे विद्यार्थ्यांनी आज आपल्या मित्र-मैत्रिणीकडे बघितले तर 33 वर्षानंतर ते चेहरे दिसले आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या. आयुष्यातले सर्व क्षण आठवणीत राहतात असे नाही, पण काही क्षण असे असतात की, जे विसरु म्हणताही विसरता येत नाही. आपण वयाने कितीही मोठे झालो किंवा आपापल्या क्षेत्रात कितीही यशस्वी झालो तरी शाळेचे ते सोनेरी दिवस आपण कधीच विसरू शकत नाही, पण वेळ कुणासाठी थांबत नाही आणि मागे पडलेले दिवस पुन्हा येत नाही. पण ह्या सर्व आठवणी अस्मरणीय असतात.

बालपणातील मैत्री ही अवखळ, उनाड, परिपक्व नसली तरीही सतत हवीहवीशी वाटणारी असते. शाळेचे विश्व आणि मित्र हे एकमेकांशिवाय अधुरे आहेत. आजच्या या स्नेह मिलन सोहळ्यात या सर्व मित्र-मैत्रिणी सोबत जगलेले सोबतचे हे दिवस अजूनही प्रत्येकांना वाटत असेल की ही भेट फारच छोटी होती. सरते शेवटी सर्व मित्रांना रिटर्न गिफ्ट देण्यात आलं. या कार्यक्रमातील प्रत्येक क्षणाच्या गोड आठवणी जपत पुढच्या वर्षी अहेरी येथील धर्मराव कृषी विद्यालयात स्नेह मिलन आयोजन करावे हे ठरले. कार्यक्रमाचे सुरुवात स्वागत गीताने तर शेवट गोड स्नेहभोजनांचा आस्वाद घेत झाले.

गडचिरोली येथिल स्नेहमिलन सोहळ्यात जुन्या आठवणींना उजाळा देत एकमेकांचे बालपण आठवण करीत शाळेतील गमतीशीर टिंगल_टवाळी करीत, विविध खेळ खेळत, हसतमुख गाणी गात नृत्य करीत आनंदी प्रसन्नतेच्या वातावरणात हा स्नेहसंमेलन सोहळा संपन्न झाला. या स्नेह मिलन सोहळ्यात 33 वर्षापूर्वीचे  धर्मराव कृषी विद्यालय अहेरी येथील विद्यार्थी व विद्यार्थीनी हे अहेरी, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया व कुरखेडा येथुन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.