आपला जिल्हा

१ लाखाची गडचिरोलीत भव्य दहीहंडी

गडचिरोली, प्रतिनिधी :-

जन्माष्टमी निमित्याने आज गडचिरोली शहरात भव्य दहीहंडी चे कार्यक्रम आयोजन विश्व हिंदू परिषद व बजरंग दल, गडचिरोली च्या वतीने करण्यात आले आहे. या वेळी १ लाख रुपयाच्या बक्षीसाची लयलूट होणार आहे.

विश्व हिंदू परिषद च्या स्थापना दिवस षष्टीपूर्ती वर्ष निमित्याने दहीहंडी चा कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले आहे.

गडचिरोली शहरातील राममंदिर ते चंद्रपूर रोड वरील देवकुले प्रांगण पर्यंत भव्य शोभयात्रा दुपारी २ वाजता काढण्यात येणार आहे.

यावेळी जिल्हाधिकारी संजय दैने, पोलीस अधीक्षक निलोत्पल, जिल्हा संघचालक घिसूलाल काबरा, जिल्हाध्यक्ष विहिप सुशील हिंगे,डॉ. संपर्क प्रमुख सुरेश परसावार,पराग दवंडे, माजी खासदार अशोक नेते, आमदार डॉ. होळी, माजी आमदार डॉ. उसेंडी, योगिताताई प्रमोद पिपरे,डॉ. मिलिंद नरोटे,डॉ. चंदाताई नितीन कोडवते आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.

संध्याकाळी ५ वाजता दहीहंडी चा कार्यक्रम होणार आहे. तरी या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक अनिल तिडके यांनी केले आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker