आपला जिल्हादेश विदेश

गडचिरोलीच्या मंथय्या बेडके यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर

गडचिरोली, प्रतिनिधी :-

एटापल्ली तालुक्यातील जाजावंडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक मंतैय्या बेडके यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.

 जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह तसेच शिक्षणाधिकारी बाबासाहेब पवार यांनी श्री बेडके यांचे अभिनंदन केले आहे.

महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला असून त्यात कोल्हापूर येथील सागर बगाडे व गडचिरोली जिल्ह्यातील एम. ए. बि. एड. असलेले मंतैय्या बेडके यांचा समावेश आहे.

५ सप्टेबर रोजी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात श्री बेडके यांना रजत पदक व ५० हजार रोख पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker