आपला जिल्हा

जिल्हयात आजही पर्जन्यमानाचा येलो अलर्ट

गडचिरोली,प्रतिनिधी :-  

गडचिरोली जिल्हयात आजही पर्जन्यमानाचा येलो अलर्ट दिलेला आहे. भारतीय हवामान विभागाचे नागपूर, हैद्राबाद, रायपूर व भोपाल केंद्र यांचे दिनांक 23.07.2023 रोजीच्या पर्जन्यमान इशारा संदेशानुसार वैनगंगा-प्राणहिता, वर्धा, इंद्रावती व मध्य गोदावरी उपखोऱ्यातील काही भागात आजही मुसळधार स्वरुपाच्या पावसाची शक्यता (येलो अलर्ट) असल्याचे संकेत जिल्हा पूर नियंत्रण कक्ष, गडचिरोली यांनी दिलेले आहे.नागरिकांनी  उचित दक्षता घ्यावी,असे आवाहन केले आहे.

नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात मागिल काही दिवसापासून झालेल्या अतिवृष्टीमुळे वैनगंगा, प्राणहिता, वर्धा, गोदावरी व इंद्रावती या मुख्य नद्यांची पाणी पातळी वाढलेली आहे. नदी काठावरील गावातील नागरिकांनी उचित सतर्कता बाळगावी, तसेच नदी पात्रात आवागमन करणाऱ्यांनी आवश्यक काळजी घ्यावी.

पूरस्थिती अहवाल

दिनांक : 24.07.2023, सकाळी : 10.00 वाजता.

  1. वैनगंगा नदी :

  • गोसीखुर्द धरणाचे 33 पैकी 11 गेट 0.50 मी. ने उघडलेले असुन 1,363 क्युमेक्स (48,146 क्युसेक्स) विसर्ग आहे.

  • चिचडोह बॅरेज चे 38 पैकी 38 गेट उघडलेले असुन विसर्ग 4,323 क्युमेक्स (152,666 क्युसेक्स) आहे.

  • वडसा, वाघोली व आष्टी या सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार वैनगंगा नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या खाली आहे. 

  1. वर्धा नदी :

  • निम्न वर्धा प्रकल्पाचे 31 पैकी 13 गेट उघडलेले असुन विसर्ग 342 क्युमेक्स (12,077 क्युसेक्स) आहे.

  • बामणी (बल्हारशा) या सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार वर्धा नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या वर आहे.

  • सिरपूर या सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार वर्धा नदीची पाणी पातळी धोका पातळीच्या वर आहे. 

  1. प्राणहिता नदी :

  • दिना प्रकल्प 100 टक्के भरलेला असून सांडव्यावरुन विसर्ग निरंक आहे.

  • महागांव सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार प्राणहिता नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या खाली आहे. 

  1. गोदावरी नदी :

  • श्रीपदा येलमपल्ली प्रकल्पाचे 62 पैकी 12 गेट उघडलेले असुन विसर्ग 2,560 क्युमेक्स (90,384 क्युसेक्स) आहे.

  • लक्ष्मी बॅरेज (मेडीगड्डा) चे 85 पैकी 75 गेट उघडलेले असुन विसर्ग 13,824 क्युमेक्स (4,88,200 क्युसेक्स) आहे. बॅरेज ची पाणी पातळी 94.40 मी. असुन पूर्ण संचय पातळीच्या 5.60 मी. ने खाली आहे.

  • कालेश्वरम सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार गोदावरी नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या खाली आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker