आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजन

गोंडवाना विद्यापीठाचा विद्यार्थी रोहीत राठोडची भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड

गडचिरोली, प्रतिनिधी :-

गोंडवाना विद्यापीठाचे घटक महाविद्यालय मॉडेल कॉलेजमधील बी.बी.ए. (जंगले व्यवस्थापन )शाखेचा विद्यार्थी रोहीत राठोड याची इंग्लंड येथे होणाऱ्या काउंटी क्लब क्रिकेट स्पर्धेसाठी जाणाऱ्या भारतीय प्रतिनिधी संघात निवड झाली आहे. या निवडीमुळे महाविद्यालयासह गोंडवाना विद्यापीठाच्या संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
रोहीत इंग्लंडमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार असून, त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेक जोशी यांच्या हस्ते त्याचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी रोहितचे अभिनंदन करून त्याच्या आगामी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत .


प्राचार्यांनी यावेळी रोहितच्या यशाचे कौतुक करत , रोहितने आपल्या मेहनती, जिद्द आणि क्रीडाप्रेमाच्या बळावर ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली असून, त्याचे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे अशा शब्दात त्याचे कौतुक केले . आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे ही अभिमानाची बाब असून, त्याने उत्कृष्ट कामगिरी करून महाविद्यालय व देशाचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे , प्र- कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनीही त्याला शुभेच्छा दिल्या.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker