आपला जिल्हा

आमदार गणपती बाप्पाचे चरणी …

गडचिरोली, प्रतिनिधी :-

देशभरात गणेश उत्सव मोठया प्रमाणात सुरु आहे. या उत्सव निमित्त गणपती बाप्पाकडे मन्नत मागण्याची संधी भक्तगणं सोडत नसून यात आता राजकीय पक्षाचे नेते मंडळीसुद्धा असून यात सर्वात अग्रेसर भाजपचे आमदार आहेत.
भाजपचे आमदार हे कार्यकर्ते च्या घरोघरी जाऊन गणपती बाप्प्पाचे दर्शन मागील तीन वर्षापासून घेण्याचा उपक्रम भाजपचे आमदर डॉ. देवराव होळी हे मतदार संघात करीत असून त्यांच्या उपस्थिती मध्ये ते आपल्या कार्यकर्ते सोबत या निमित्याने येणाऱ्या विधानसभा निवडणुकी बाबत चर्चा करीत असून त्यांना पाठिंबा मिळत असून या मुळे त्यांचा उत्साह वाढला आहे.


आमदार डॉ देवराव होळी यांनी चामोर्शी शहरातील घरगुती गणपती बाप्पाचे आज दर्शन अनेक कार्यकर्त्यांचा घरी जाऊन घेतले.


चामोर्शी शहरातील शेषराव कोठारे, चंद्रकांत दोषी यांच्या घरगुती गणपती बाप्पाचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी गणपती बाप्पा चरणी नतमस्तक होत दर्शन घेतले.


यावेळी परिवारातील महेश कोठारे, प्रेरित कोठारे, यांच्यासह भाजपा जिल्हा सचिव दिलीप चलाख, तालुका उपाध्यक्ष जैराम चलाख, युमो तालुका अध्यक्ष निखिल धोडरे, अंशुल दासरवार उपस्थित होते.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker