अपघातआपला जिल्हा
अपघात प्रवण स्थळ निश्चितीसाठी तपासणी मोहीम राबवा-जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा
जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या आढाव्यात सूचना

गडचिरोली, प्रतिनिधी :-
जिल्ह्यातील अपघात प्रवण स्थळांची ओळख निश्चित करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग, उपप्रादेशिक परिवहन विभाग व पोलीस विभाग आदी सर्व यंत्रणांनी संयुक्त तपासणी मोहीम राबवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज दिल्या.
जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचा आढावा जिल्हाधिकारी पंडा यांनी आज घेतला, याप्रसंगी ते बोलत होते. बैठकीला सहायक जिल्हाधिकारी राहुल मीना, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सुर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किलनाके, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक जाधव, सहायक अधीक्षक अभियंता सुमीत मुंदडा, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक शरद मेश्राम, तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे सर्व उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.



