पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी. या मागणीसह गडचिरोली जिल्ह्यातील पत्रकारांना संरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी आज गडचिरोली येथे मूक मोर्चा काढण्यात आला.
NDTV व बस्तर जॅक्शन चे पत्रकार मुकेश चंद्रकार छत्तीसगड यांची निघृण हत्या करण्यात आली. या प्रकरणाची योग्य ती चौकशी करून त्यांच्या मारेकरांना फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच गडचिरोली जिल्हयात रेती, मुरूम माफीया, दारू विक्रेते यांचे अवैध धंदे बंद करावे तसेच जिल्ह्यातील पत्रकार हे वृतांकन करण्यासाठी नक्षलग्रस्त भागात जात असतात. यापार्श्वभूमीवर मुकेश चंद्राकार यांची पुर्नरावृत्ती गडचिरोली जिल्हयात होवू नये या साठी महाराष्ट्र शासन अधिनियम सन २०१९ क्र.१९ दिनांक ८ / १० / २०१९ राजपत्रानुसार जिल्ह्यातील पत्रकारांना संरक्षण देण्यात यावे यासह आदि मागण्याकरीता गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढून जिल्ह्याधिकारी अविशांत पडां व जिल्हा पोलीस अधिक्षक निलोत्पल यांना मागण्याचे निवेदन देण्यातआले.
जिल्हाधिकारी यांच्या मार्फतीने देशाचे महामहिम राष्ट्रपती महोदया, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा,महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री छत्तीसगड, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणविस आदिना मागण्याचे निवेदन देण्यात आले.