आपला जिल्हाक्राईम

शिवणी अत्याचार प्रकरण छ्तीसगड येथील आरोपीला अटक 

आरोपी अनिल संतू उसेंडीअटकेत

गडचिरोली, प्रतिनिधी :-

शिवणी येथील तरुणीला मारहाण करुन अत्याचार करणा­या आरोपीस गडचिरोली पोलीसांनी केली शिताफिने अटक केली आहे. पिडीतेच्या बयाणानंतर आरोपीला केले 24 तासाच्या आत अटक गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे.

 गडचिरोली-चामोर्शी मार्गावर असलेल्या मौजा शिवणी येथील कर्ण बधिर असलेली तरुणी दिनांक 02 मार्च 2025 रोजी सायंकाळी 05.30 वा. चे सुमारास गावाबाहेर शौचास गेली असताना, अज्ञात आरोपीकडून सदर तरुणी एकटी असल्याचा फायदा घेत तरुणीला निर्दयीपणे मारहाण करुन तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याची घटना घडली होती.

सदर तरुणी ब­याचवेळा नंतरही घरी न आल्याने नातेवाईकांनी तरुणीचा शोध घेतला असता, ती गावाबाहेरील परिसरात बेशुद्ध स्थितीत आढळून आली होती. तरुणीला तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे रात्री उपचाराकरीता दाखल करण्यात आले होते.

गडचिरोली येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर दिनांक 03 मार्च 2025 रोजी तरुणीला नागपूर येथील शासकिय रुग्णालयात हलविण्यात आले होते. तरुणीवर अत्याचार झाला असल्याची शक्यता वैद्यकिय अधिका­यांकडून व्यक्त करण्यात आलेली होती.

घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश व इतर वरिष्ठ अधिका­यांनी घटनास्थळाला भेट दिल्यानंतर पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिलेल्या आदेशानूसार स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली व पोस्टे गडचिरोलीची समांतर तपास पथके तयार करुन आरोपीचा शोध सुरु करण्यात आला होता.

उपचारादरम्यान आज दिनांक 04/03/2025 रोजी दुपारी सदर तरुणी आपले बयाण देण्यासाठी सक्षम असल्याचे वैद्यकिय अधिका­यांकडून प्रमाणित करण्यात आल्यानंतर गडचिरोली पोलीसांकडून सदर तरुणीचे बयाण नोंदवून घेण्यात आले. पिडीत तरुणीच्या बयाणावरुन आरोपीविरुद्ध पोस्टे गडचिरोली येथे अप.क्र. 131/2025 कलम 64 (1), 64 (2) (एल), 115 भान्यासं अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बयाणादरम्यान तरुणीने सांगितलेल्या वर्णनावरुन आरोपीचे रेखचित्र पोलीसांकडून तयार करुन घेण्यात आले होते.

सदर रेखाचित्रावरुन पोलीसांनी गोपनिय सुत्रांकडून माहिती मिळवत संशयित इसम अनिल संतू उसेंडी, वय 23 वर्षे, रा. दोबे, ता. ओरच्छा, जि. नारायणपूर (छ.ग.) हल्ली मुक्काम शिवणी ता. व जि. गडचिरोली यास चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.आरोपीची कसून चौकशी केली असता, आरोपीने सदर गुन्हा केल्याचे पोलीसांसमक्ष कबूल केले आहे.

सदर गुन्ह्राचा पुढील तपास पोलीस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे हे करीत आहेत.

 सदरची कारवाई प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली विशाल नागरगोजे, स्था.गु.शा. गडचिरोलीच पो.नि. अरुण फेगडे, पोस्टे गडचिरोलीचे पोनि. रेवचंद सिंगनजुडे, पोस्टे गडचिरोली व स्था.गु.शा.चे अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी केलेली आहे.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker