आपला जिल्हाक्राईम
गडचिरोली जिल्हा पुन्हा हादरला,मुख्याध्यापकाचे बालिकाशी अश्लील कृत्य

गडचिरोली,प्रतिनिधी :-
मौजा कुक्कामेट्टा येथील प्राथमिक शाळेत अल्पवयीन बालिकांसोबत अश्लील कृत्य करणाया मुख्याध्यापकास गडचिरोली पोलीसांनी बेड्या घातल्या आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील मौजा कुक्कामेट्टा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील हि घटना आहे. या मुळे शिक्षण खात्याला काळिमा मुख्याध्यापकाने लावला आहे.
गडचिरोली जिल्हयातील भामरागड तालुक्यातील मौजा कुक्कामेट्टा येथील प्राथमिक शाळेत मागील काही दिवसांपासून शाळेच्या मुख्याध्यापकांकडूनच शाळेतील अल्पवयीन बालिकांसोबत अश्लील कृत्य केले जात असल्याची घटना समोर आली आहे. जागृत पालकांच्या समजदारीमुळे आणि बालिकांच्या वागण्यामध्ये दिसून आलेले बदल व भिती पालकांनी हेरल्यामुळे सदरची घटना उघडकीस आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून एकाच कुटुंबांतील दोन पीडित बालिका शाळेत जाण्याची तयारी करत असताना शाळेत जाण्यासाठी नकार देत होत्या व शाळेत जाण्यासाठी घाबरत होत्या. हा प्रकार पालकांच्या लक्षात आल्याने पालकांनी सदर अल्पवयीन बालिकांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता बालिकांनी शाळेचे मुख्याध्यापक रविंद्र उष्टुजी गव्हारे हे त्यांना वेगवेगळया वेळी शाळेतील ऑफिसमध्ये रजिस्टर घेऊन येण्याच्या बहाण्याने बोलावून इतर कोणीही नसताना त्यांच्यासोबत अश्लील कृत्य करत असतात व या प्रकाराबाबत कोणाला सांगितले तर मारण्याची व शाळेतून काढण्याची धमकी देत असतात असे सांगितले.
पालकांनी गांभीर्य लक्षात घेऊन त्याच शाळेमध्ये शिकणाया इतर बालिकांच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांसमक्ष बालिकांकडे चौकशी केली असता, मुख्याध्यापक रविंद्र उष्टुजी गव्हारे यांनी काही इतर मुलींसोबत देखील या प्रकारचे अश्लील कृत्य केले असल्याचे बालिकांनी सांगितले.



