आपला जिल्हा
गडचिरोलीत कर्मचाऱ्यांचे धरणे- सत्याग्रह

गडचिरोली,प्रतिनिधी :-
गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्ह्यातील सर्व संघटनेच्या वतीने धरणा सत्याग्रह करण्यात आला. या धरणा कार्यक्रमात शेकडो कर्मचारी सहभागी झाले होते.
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हा गडचिरोली चे जिल्हाध्यक्ष सुनील चडगुलवार यांचे नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली समोर ६ मार्च 2025 रोजी सरकारी, निमसरकारी, शिक्षक -शिक्षकेतर, नगरपंचायत- नगरपरिषद ,चतुर्थ श्रेणी कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने धरणा सत्याग्रह आयोजित करण्यात आला.

राज्य सरकारी कर्मचारी तसेच शिक्षकांच्या 18 प्रलंबित मागण्याबाबत शासनाकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही केवळ चर्चा करून मागण्याबाबत जैसे तथे स्थिती राहिल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय येथील तसेच सर्व विभागातील कर्मचारी या धरणा सत्याग्रहात उपस्थित होते.
निदर्शने कार्यक्रमानंतर अपर जिल्हाधिकारी यांचेकडे निवेदन सादर करण्यात आले.




