चामोर्शी, प्रतिनिधी :-
चामोर्शी येथे ४ लाख रुपयांची दारू जप्त करण्यात आली. असून आरोपीना अटक करण्यात आली असून एक आरोपीचा शोध सुरु आहे.अवैध दारू आणि चारचाकी वाहनसह एकूण ७ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गडचिरोली जिल्हयात दारुबंदी असतांना अवैधरित्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. त्याविरुध्द पोलीस अधीक्षक यांचे अवैध दारु विक्री करणायांवर अंकुश लावण्याबाबत आदेशानुसार काल दिनांक 06 मार्च 2025 रोजी इसम नामे गोलु मंडल, रा. कुनघाडा, ता.चामोर्शी, जि. गडचिरोली हा अवैध रित्या आपल्या साथीदारांच्या मदतीने चारचाकी वाहनाने देशी व विदेशी दारूची चंद्रपूर जिल्ह्यातून चामोर्शी हद्दीत वाहतूक करणार आहे, अशा मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन स्था.गु.शा. चे सपोनि. राहुल आव्हाड व त्यांचे पथक रवाना करण्यात आले.
सदर पथक रात्री 02.00 वा. दरम्यान चामोर्शीच्या पश्चिमेस 02 कि.मी. येथे सापळा रचून बसलेे असता, एक चारचाकी वाहन हे भरधाव वेगाने येताना दिसले. त्यावेळी पोलीसांनी वाहन चालकाला हात दाखवून वाहन थांबविण्याचा इशारा दिला. त्यानंतर पोलीस पथकाने वाहनाची जवळून तपासणी केली.
सदर वाहनाच्या तपासणी दरम्यान त्यात अवैध देशी व विदेशी दारू असलेल्या 50 पेटी (बॉक्स) किंमत अंदाजे 4,00,000/- रु. (चार लाख रु.) मिळून आल्याने सदर अवैध दारु सहित एक चारचाकी मारुती सुझुकी कंपनीचे विटारा ब्रिाझा वाहन क्र. एम. एच. 49 बी.बी.2627 किंमत अंदाजे 3,00,000/- (तीन लाख रु.) असा एकुण 7,00,000/- (सात लाख) रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन संबंधीत घटनेच्या अनुषंगाने पोस्टे चामोर्शी येथे इसम नामे 1) गोलु मंडल, वय-32 वर्षे, रा. कुनघाडा, ता.चामोर्शी, जि. गडचिरोली, 02) गणेश नरेंद्र नैताम, वय-22 वर्षे, व्यवसाय वाहन चालक, 3) नीरज किरण भुर्रे, वय-18 वर्षे, दोघेही रा. गोकुलनगर, ता. जि. गडचिरोली, याचे विरुध्द कलम 65 (अ), 83, 98 (2) महा.दा.का अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून 01) गणेश नरेंद्र नैताम, वय-22 वर्षे, 2) नीरज किरण भुर्रे, वय-18 वर्षे, दोघेही रा. गोकुलनगर, ता. जि. गडचिरोली, यांना पुढील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
तसेच सदर गुन्हयात पाहिजे असलेले एक आरोपी नामे गोलु मंडल, वय-32 वर्षे, रा. कुनघाडा, ता.चामोर्शी, जि. गडचिरोली, ता. जि. गडचिरोली याचा शोध घेणे सुरु असून पोस्टे चामोर्शी येथे गुन्ह्राचा पुढील तपास सुरु आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक निलोलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि. राहुल आव्हाड यांच्या नेतृत्वात पोअं/प्रशांत गरफडे, पोअं/शिवप्रसाद करमे आणि चापोअं/माणिक निसार यांनी पार पाडली.
Back to top button