आपला जिल्हासामाजीक

चामोर्शीत तेली समाज वधू-वर परिचय व नोंदणी मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

"सामूहिक विवाह मेळावे होणे आजच्या काळाची गरज" — सौ. योगिता पिपरे

चामोर्शी (जि. गडचिरोली), प्रतिनिधी :-

श्री द्वारकाप्रसाद सातपुते बहुउद्देशीय संस्था, चामोर्शी यांच्या वतीने रविवार, दिनांक ५ ऑक्टोबर २०२५ रोजी संताजी भवन येथे तेली समाज वधू-वर परिचय व नोंदणी मेळाव्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

‘दसरा आणि दिवाळीनिमित्त एक पाऊल समाजासाठी’ या संकल्पनेतून आयोजित या मेळाव्याला गडचिरोली जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भातून वधू-वर आणि त्यांच्या पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

सकाळी ११:३० वाजता सुरू झालेल्या या मेळाव्याने समाजातील तरुणांना योग्य जीवनसाथी निवडण्यासाठी एक प्रभावी व विश्वासार्ह व्यासपीठ उपलब्ध करून दिले.

कार्यक्रमाचे उद्घाटन सौ. योगिताताई प्रमोदजी पिपरे (माजी नगराध्यक्ष, नगरपरिषद गडचिरोली व जिल्हा अध्यक्षा भाजपा महिला आघाडी, गडचिरोली) यांच्या शुभहस्ते झाले.

अध्यक्षस्थानी गजानराव भांडेकर (अध्यक्ष, मार्कंडा देवस्थान ट्रस्ट) होते.

प्रमुख अतिथी म्हणून  बाबुराव कोहळे (नागपूर विभागीय उपाध्यक्ष, प्रांतिक तेली महासंघ), योगीताताई भांडेकर (माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद, गडचिरोली), आणि मा. प्रमोद पिपरे (जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासंघ व माजी सभापती, नगरपरिषद गडचिरोली) हे उपस्थित होते.

दीपप्रज्वलनानंतर मार्गदर्शनपर भाषणात सौ. योगिता पिपरे म्हणाल्या,

 “योग्य जोडीदार निवडण्यात पालक आणि वधू-वरांना मदत करणे हे समाजाचे कर्तव्य आहे. अशा मेळाव्यांमुळे विवाह प्रक्रिया सुलभ होते. तेली समाजात असे उपक्रम होणे आजच्या काळाची गरज आहे.”

तर प्रमोद पिपरे यांनी समाजाच्या संघटन व प्रगतीसाठी अशा कार्यक्रमांचे महत्त्व अधोरेखित करत संस्थेचे मन:पूर्वक अभिनंदन केले.

या मेळाव्याचे आयोजन श्री द्वारकाप्रसाद सातपुते बहुउद्देशीय संस्था, चामोर्शी आणि Wadhuwar Parichay (OPC) Pvt. Ltd., आरमोरी यांनी संयुक्तरित्या केले.

एकूण ९५ पेक्षा अधिक वधू-वरांची नोंदणी या मेळाव्यात झाली. सर्व नोंदणीकृत जोडप्यांना व पालकांना शुभेच्छा देऊन पदाधिकाऱ्यांनी मेळावा यशस्वी केल्याबद्दल आभार मानले.

या निमित्ताने तेली समाजातील कुटुंबांना विवाह जुळवण्याच्या दृष्टीने मोठी मदत झाली असून समाजात एक सकारात्मक संदेश पोहोचल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

कार्यक्रमास महाराष्ट्र प्रांतिक तेली समाजाचे विविध पदाधिकारी, समाज बांधव आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रमुख पाहुण्यांमध्ये वेंकटेश सोमनकर, तुळशीदास कुणघाडकर सर, मधुकर भांडेकर, आणि  जितेश वैरागडे यांचा समावेश होता.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker