आपला जिल्हा
पुण्यश्लोक अहिल्यादेवी त्रिशताब्दी जयंती निमित्त जाहिर व्याख्यान
कर्तबगार महिला शिक्षकांचा सत्कार सोहळा

गडचिरोली, प्रतिनिधी :-
अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ नवी दिल्ली संलग्नीत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक जि. प./ न.प./मनपा) नागपूर विभाग आढावा बैठक व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जन्म जयंती निमित्त जाहिर व्याख्यान व कर्तबगार महिला शिक्षकांचा सत्कार सोहळा आयोजित केला आहे.
जिल्हा शाखा गडचिरोली यांचे वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जन्म जयंती उत्सव निमित्ताने गडचिरोली जिल्ह्यातील कर्तबगार महिला शिक्षिका व कोरोना काळात अध्यापनाचे कार्य करणाऱ्या स्वयंसेवीकांना आदर्श शिक्षका पुरस्काराने सन्मानित करण्याचे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. मिलिंद रामजी नरोटे, आमदार, गडचिरोली विधानसभा क्षेत्र हे राहणार आहेत.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्रीमती गुंफा अंबादे, जिल्हा महिला आघाडी प्रमुख, म.रा.शि.प. प्राथ. विभाग, जि. गडचिरोली
प्रमुख वक्ते – मा. प्रा. किशोर ओलालवार, सामाजिक कार्यकर्ते चामोर्शी तसेच प्रमुख उपस्थिती भिखाभाई पटेल, उपाध्यक्ष, अ.भा.रा.शे. महासंघ, नवी दिल्ली. मधुकरजी उन्हाळे, प्रांताध्यक्ष, म.रा.शि.प. प्राथ. विभाग
पुरुषोत्तमजी काळे, प्रांताकार्यवाह, म.रा.शि.प.प्राथ. विभाग अविनाश तालापल्लीवार, प्रांताकोषाध्यक्ष, म.रा.शि.प. प्राथ. विभाग देवरावजी होळी, माजी आमदार, गडचिरोली विधानसभा. संतोष सुरावार, विभागीय कोषाध्यक्ष, म.रा.शि.प. खाजगी बाबासाहेब पवार, शिक्षणाधिकारी प्राथमिक, जि.प., गडचिरोली
सुनिताजी मेहता, डायरेक्टर, प्रोजेक्ट सीएसआर, लॉयड मेटल्स, विजय साळवे, जिल्हाध्यक्ष, म.रा.शि.प. प्राथ. विभाग, जि. गडचिरोलली 31 मार्च 2025 रोज सोमवारला सकाळी 10.00 वाजता स्थळ जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, गडचिरोली
कार्यक्रमाची रुपरेषा –
प्रथम सत्र – सकाळी 10 ते 11 उद्घाटन सोहळा
सकाळी 11 ते 12 – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर मार्गदर्शन
द्वितीय सत्र – दुपारी 12 ते 1.30 मान्यवरांचे मार्गदर्शन
दुपारी 1.45 ते 2.45 मातृशक्ती सत्कारमुर्तीचा सन्मान सोहळा व जुतन महिला आघाडी जिल्हा कार्यकारीणी निवड व घोषणा
दुपारी 3 ते 3.30 भोजन अवकाश
तृतीय सत्र – दुपारी 3.30 ते 4.30 नागपूर विभागीय आढावा बैठक व समारोप



