आपला जिल्हा

संसदीय मूल्यांचा अवमान – खा. डॉ. किरसान यांचा आरोप.

गडचिरोली, प्रतिनिधी :-

    लोकसभेत एन डी ए सरकारकडून संसदीय प्रक्रियेचा आणि प्रस्थापित लोकशाही मूल्यांचा सातत्याने अवमान केला जात असल्याचे आरोप आज गडचिरोली-चिमूर लोकसभा खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

एक सुदृढ लोकशाही ही संसदेच्या सुरळीत कार्यप्रणालीवर अवलंबून असते, जिथे पक्षभेद न करता सर्व सदस्यांना चर्चा करण्याची आणि आपली घटनात्मक कर्तव्ये पार पाडण्याची समान संधी दिली जाते. मात्र, सध्याच्या काळात काही गंभीर घटना समोर आल्या आहेत, ज्या संसदेच्या प्रतिष्ठेला तडा देत आहेत.

 लोकसभेच्या उपाध्यक्ष पदाची नियुक्ती न होणे २०१९ पासून लोकसभेचे उपाध्यक्ष पद रिक्त आहे, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १३ नुसार त्यांची निवड बंधनकारक आहे. या पदाचा रिक्तपणा संसदेच्या कार्यक्षमतेस हानीकारक करत आहे.

विरोधी पक्षनेत्याला बोलण्याची संधी न मिळणे विरोधी पक्षनेत्याला उभे राहिल्यावर बोलण्याची संधी देण्याची परंपरा वारंवार मोडली जात आहे. हे संसदीय व्यवहारांचे उल्लंघन असून चर्चेच्या लोकशाही अधिश्वानावर आघात आहे.असाही आरोप खासदार किरसान यांनी केला.

पत्रकार परिषदेत विरोधी पक्षाच्या नेत्यांचे आणि खासदारांचे माईक बंद करणे, विरोधी पक्षाच्या खासदारांनी मुद्दे उपस्थित केले असता वारंवार त्यांचे माईक बंद केले जातात, तर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांना विनासायास बोलण्याची संधी दिली जाते. यामुळे संसदीय चर्चेचे स्वरूप पक्षपाती बनत आहे. व्यवसाय सल्लागार समितीच्या (BAC) निर्णयांकडे दुर्लक्ष सरकारकडून संसदेच्या व्यवसाय सल्लागार समितीला (BAC) न विचारता महत्त्चाचे प्रस्ताव सादर केले जात आहेत. उदाहरणार्थ, गेल्या आठवडयात पंतप्रधानांनी संसदेत कोणतीही पूर्वसूचना न देता भाषण केले.

 महत्त्वाच्या मंत्रालयांचा अर्थसंकल्पीय चर्चेत समावेश न करणे अनेक महत्त्वाची मंत्रालये आता अर्थसंकल्पीय चर्चेतून वगळली जात आहेत, त्यामुळे आर्थिक निर्णयांवर संसदय नियंत्रण कमी होत आहे.

जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या प्रमुख उपस्थित पत्रकार परिषद पार पडली.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस प्रदेश सचिव विश्वजित कोवासे, शहराध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली सतीश विधाते, जिल्हाध्यक्ष महिला काँग्रेस कमिटी गडचिरोली कविताताई मोहरकर, काँग्रेस नेते प्रभाकर वासेकर,तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली वसंत राऊत, तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी चामोर्शी प्रमोद भगत, तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी आरमोरी मिलिंद खोब्रागडे,शहराध्यक्ष सोशल मीडिया विभाग संजय चन्ने, जिल्हाउपाध्यक्ष शंकरराव सालोटकर,माधव गावड, देवाजी सोनटक्के, जिल्हाध्यक्ष पर्यावरण विभाग काँग्रेस कमिटी गडचिरोली राजेश ठाकूर, जिल्हाध्यक्ष अनु. जाती. विभाग काँग्रेस कमिटी गडचिरोली रजनीकांत मोटघरे, जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस कमिटी गडचिरोली नितेश राठोड, जितेंद्र मुनघाटे, जिल्हाध्यक्ष परिवहन विभाग काँग्रेस कमिटी गडचिरोली रुपेश टिकले,गौरव येनप्रेड्डीवार, कुणाल ताजने,सुधीर बांबोळे,लालाजी सातपुते, प्रेमचंद धकाते, तालुका अध्यक्ष अल्पसंख्याक विभाग काँग्रेस कमिटी गडचिरोली जावेद खान,संदीप भैसारे, चूळाराम कोलते,भैय्याजी मुद्दमवार, मंथन मुनघाटे, वैभव गव्हारे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker