आपला जिल्हा
गडचिरोली भाजपा जिल्ह्याध्यक्ष पदी रमेश बारसागडे

गडचिरोली, प्रतिनिधी :-
गडचिरोली भाजपाच्या जिल्ह्याध्यक्ष पदावर प्रा. रमेश बारसागडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत आज घोषणा करण्यात आली.

गडचिरोली जिल्हा भाजपा जिल्हा अध्यक्षपदी जोरदार रस्सीखेच सुरु होती. विद्यमान जिल्ह्याध्यक्ष प्रशांत वाघरे यांचा कार्यकाळ संपल्यामुळे ते या पदावर इच्छुक होते. या सोबत भाजपचे जेष्ठ नेते माजी सभापती प्रमोद पिपरे, महामंत्री गोविंद सारडा या नेत्यांना वगळून भाजपने प्रथमच धक्का देत प्रा. रमेश बारसागडे यांची निवड प्रदेश निवडणूक अधिकारी आमदार चैनसुख संचेती यांनी केली आहे.




