आपला जिल्हा

“७ महिला शिक्षिका व ५ पुरुष शिक्षक” यांना शिक्षक गुणगौरव पुरस्कार

११ सप्टेंबरला गडचिरोलीत होणार सत्कार सोहळा

गडचिरोली,प्रतिनिधी :-

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे आयोजित जिल्हास्तरीय शिक्षक गुणगौरव पुरस्कार २०२५ साठी गडचिरोली जिल्ह्यातील एकूण १२ गुणवंत शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यामध्ये ७ महिला शिक्षिका आणि ५ पुरुष शिक्षकांचा समावेश आहे. या शिक्षकांचा गौरव सोहळा ११ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे पार पडणार आहे.

निवड झालेल्या गुणवत्तावंत शिक्षकांची यादी

महिला शिक्षिका (७):

कु. वनश्री जाधव – वि.शि., जि.प. शाळा गांगाव, गडचिरोली

कु. प्रीती नवघडे – प्रा.शि., जि.प. शाळा कुनघाडा रै, चामोर्शी

कु. शितल कुमरे – वि.शि., जि.प. शाळा बिहीटेकला, कोरची

कु. हेमलता आखाडे – वि.शि., जि.प. शाळा शिवणी बु., आरमोरी

कु. सिंपल मुधोळकर – वि.शि., जि.प. शाळा डुम्मे, एटापल्ली

कु. उज्वला बोगामी – पद.शि., जि.प. शाळा आरेवाडा, भामरागड

कु. सुरेखा मेश्राम – प्रा.शि., जि.प. शाळा शिवणीपाठ, अहेरी

पुरुष शिक्षक (५):

श्री. बालाजी मुंडे – प्रा.शि., जि.प. शाळा बदबदा, कुरखेडा

श्री. प्रवीण मुंजमकर – प्रा.शि., जि.प. शाळा बोळधा, देसाईगंज

श्री. मुरली गाइन – प्रा.शि., जि.प. शाळा विजयनगर, मुलचेरा

श्री. रमेश रच्चावार – पद.शि., जि.प. शाळा नगरम, सिरोंचा

श्री. विलास दरडे – प्रा.शि., जि.प. शाळा उदेगाव, धानोरा

गौरव समारंभ

या कार्यक्रमात शिक्षकांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाची दखल घेत त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. शिक्षकवर्गाला प्रेरणा व प्रोत्साहन देण्याच्या हेतूने हा उपक्रम राबविण्यात येत असून जिल्ह्यातील शिक्षणक्षेत्रासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.

नागरिकांनी कार्यक्रमास उपस्थित राहून शिक्षकांचा गौरव वाढवावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी (योजना) नितीन बच्छाव, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) वासुदेव भुसे व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाबासाहेब पवार यांनी केले आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker