आपला जिल्हाक्राईम

26 भरमार बंदुका व 11 बॅरल गडचिरोली पोलिसांच्या स्वाधीन

गडचिरोली, प्रतिनिधी :-

गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर स्वेच्छेने आपल्याकडे असलेल्या बंदुका पोलिसांकडे जमा करून नागरीकृतीचा आदर्श उभारला आहे. पोस्टे वांगेतुरी हद्दीतील मौजा हिंदुर, नैनवाडी आणि तोडगट्टा या भागातील नागरिकांनी एकूण 26 भरमार बंदुका व 11 बंदुकीची बॅरल गडचिरोली पोलिसांच्या स्वाधीन केली आहेत.

गडचिरोली जिल्हा हा प्रामुख्याने जंगल व दुर्गम प्रदेश असल्याने अनेक नागरिक शेतीसोबत शिकार करून उदरनिर्वाह करतात. वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठी व वडीलोपार्जित स्वरूपात त्यांच्या जवळ या बंदुका असतात. मात्र या पारंपरिक शस्त्रांचा गैरवापर माओवादी संघटना करून नागरिकांना भुलवण्याचा प्रयत्न करत असल्याने पोलिस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी नागरिकांना स्वेच्छेने शस्त्रे पोलिस ठाण्यात जमा करण्याचे आवाहन केले होते.

या आवाहनाला उत्तम प्रतिसाद देत वांगेतुरी हद्दीतील नागरिकांनी मोठ्या विश्वासाने शस्त्रे पोलिसांकडे जमा केली. या मोहिमेचे नेतृत्व उपविभागीय पोलीस अधिकारी हेडरी श्री. योगेश रांजणकर यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे वांगेतुरीचे प्रभारी अधिकारी सपोनि दिलीप खडतरे, पोउपनि सादुलवार, पोउपनि काळे, तसेच सीआरपीएफचे अधिकारी व अंमलदार यांनी प्रभावी नागरीकृती उपक्रम राबविला.

गेल्या काही वर्षांत या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सन 2022 मध्ये 73, 2023 मध्ये 46, 2024 मध्ये 26 आणि 2025 मध्ये आतापर्यंत 29 भरमार बंदुका व 12 बॅरल नागरिकांनी पोलिसांच्या स्वाधीन केल्या आहेत. आतापर्यंत एकूण 365 भरमार बंदुका गडचिरोली पोलिसांकडे जमा झाल्या आहेत.

ही सकारात्मक घडामोड पाहता गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांचा पोलिस दलावरचा विश्वास वाढताना दिसून येतोय. यामुळे जिल्ह्यातील माओवादी चळवळ संपुष्टात येण्याच्या दिशेने पाऊल उचलले गेले असल्याचे स्पष्ट होत आहे.

या उल्लेखनीय कार्याबद्दल पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी या मोहिमेत सहभाग घेतलेल्या अधिकारी व अंमलदारांचे तसेच स्वेच्छेने बंदुका स्वाधीन करणाऱ्या नागरिकांचे कौतुक केले आहे.

संपूर्ण कामगिरी ही पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान)  एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता)  सत्य साई कार्तिक, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन)  गोकुल राज जी., उपविभागीय पोलीस अधिकारी हेडरी  योगेश रांजणकर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पाडण्यात आले.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker