आपला जिल्हा

खराब रस्त्यांवर जिल्हाधिकाऱ्यांची कडक दखल – कंत्राटदाराविरुद्ध सुनावणी सुरू

गडचिरोली,प्रतिनिधी :-

जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांची दुरवस्था आणि नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी स्वतःहून (सुमोटो) या प्रकरणाची दखल घेत संबंधित कंत्राटदाराविरुद्ध ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली असून, आज या प्रकरणाची औपचारिक सुनावणी घेण्यात आली.

खराब रस्त्यांच्या गंभीर प्रश्नावर प्रशासनाने दाखविलेली ही तत्परता नागरिकांत समाधान निर्माण करणारी ठरली आहे. “सार्वजनिक कामांमध्ये गुणवत्ता आणि जबाबदारी बंधनकारक आहे. निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही. अशा प्रकरणांमध्ये नियमितपणे सुनावणी घेऊन कठोर कारवाई केली जाईल,” असा कडक इशारा जिल्हाधिकारी पंडा यांनी या सुनावणीदरम्यान दिला.

शासकीय निविदेनुसार महामार्गाचे बांधकाम, डांबरीकरण, दुरुस्ती आणि देखभाल करण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित कंत्राटदारावर आहे. तथापि, रस्त्यांची दुरवस्था होऊन नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत असल्याचे निदर्शनास आले. या निष्काळजीपणाबाबत जिल्हाधिकारी पंडा यांनी स्वतः तपास करून कंत्राटदाराविरुद्ध सुनावणीची नोंद केली.

ही कारवाई ‘भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३’ मधील कलम १५० ते १५२ अंतर्गत करण्यात आली आहे. या कलमान्वये सार्वजनिक सुव्यवस्था, सुरक्षितता आणि नागरिकांच्या सुविधांवर परिणाम करणाऱ्या उपद्रवात्मक कृतींवर दंडाधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे नवे कायदेशीर अधिकार प्राप्त झाले आहेत.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker