निवडणूक
वंचित बहुजन आघाडीचे निरीक्षकपदी गजानन बारसिंगे यांची नेमणूक

गडचिरोली, प्रतिनिधी :-
नगर परिषद गडचिरोलीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने आपल्या निरीक्षकांची घोषणा केली आहे. या अंतर्गत जी. के. (गजानन) बारसिंगे यांची गडचिरोली नगर परिषदेचे निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
वंचित बहुजन आघाडी, पूर्व विदर्भ विभागाच्या वतीने, गडचिरोली जिल्ह्यात होऊ घातलेल्या नगर परिषद, नगर पंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी निरीक्षकांची नेमणूक जाहीर केली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील निरीक्षकांची नावे पुढीलप्रमाणे :–
🔹 गडचिरोली नगर परिषद :-
जी. के. बारसिंगे, विलास कळझरकर, सौ. सिमा खोब्रागडे
🔹 आरमोरी नगर परिषद :-
कुंता मेश्राम, नर्मदा मेश्राम, श्री. जगदीश दामले
🔹 वडसा नगर परिषद :-
राजरतन मेश्राम, प्रा. भिमराव शेंडे, प्रमोद मेश्राम


