निवडणूकमहाराष्ट्रराजकीय
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुरेश पोरेड्डीवार यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
भाजपच्या विचारसरणीवर हर्षवर्धन सपकाळ यांची घणाघाती टीका

गडचिरोली, प्रतिनिधी :-
भाजप विचारधारेच्या लोकांनी पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, सावित्रीबाई फुले यांना प्रचंड त्रास दिला. आजही “आम्हीच मोठे, बाकी सगळे कनिष्ठ” हाच भाजपचा विचार आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गडचिरोली येथे केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) ज्येष्ठ नेते व माजी नगराध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार, माजी प्राचार्य कविता पोरेड्डीवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा हर्षलता येलमुले, माजी सभापती विजय गोरडवार, अॅड. लालसू नोगोटी, तसेच शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी सपकाळ बोलत होते.
भाजपवर सपकाळ यांचा हल्ला-
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, “काँग्रेसने गोरगरिबांना अन्न, निवारा आणि सुरक्षा दिली. राज्यघटनेत पाचव्या अनुसूचीद्वारे आदिवासींच्या जमिनींचे रक्षण केले. परंतु आता त्या जमिनी खाण व्यावसायिकांना भाडेतत्त्वावर देण्याचा घाट भाजपने घातला आहे. सत्तेत असताना भाजपने कोट्यवधी रुपयांचा साठा केला आणि तोच पैसा सत्तेसाठी वापरत आहे. देशाच्या पंतप्रधानांना श्रीमंतांविषयी आपुलकी आहे, पण गरिबांविषयी कळवळा नाही,” अशी टीका त्यांनी केली.
नेत्यांची भाषणे व संदेश-
या प्रसंगी आ. विजय वडेट्टीवार यांनी भाजप व राज्य सरकारवर तीव्र शब्दांत टीका करत, “जनतेने पुन्हा एकदा काँग्रेसकडे विश्वासाने पाहावे,” असे आवाहन केले.
आ. मसराम, आ. वंजारी, महेंद्र ब्राम्हणवाडे, सुरेश पोरेड्डीवार व विजय गोरडवार यांनीही आपली मते व्यक्त केली.

काँग्रेस नेत्यांची उपस्थिती-
या कार्यक्रमाला आ. विजय वडेट्टीवार, आ. रामदास मसराम, आ. अभिजित वंजारी, काँग्रेस निरीक्षक संदेश सिंगलकर, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, प्रदेश सरचिटणीस रवींद्र दरेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष रावत, पंकज गुड्डेवार, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव विश्वजित कोवासे, माजी नगराध्यक्ष अॅड. राम मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहराध्यक्ष सतीश विधाते यांनी केले.
काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या प्रमुख व्यक्ती:-
१. सुरेश सावकार पोरेड्डीवार, माजी नगराध्यक्ष, न.प. गडचिरोली
२. कविताताई पोरेड्डीवार, माजी प्राचार्य
३. डॉ. हेमंत अप्पलवार, नेत्रतज्ञ
४. हर्षलताताई येलमुले, माजी जि.प. अध्यक्षा
५. विजय गोरडवार, माजी सभापती व शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
६. अस्मिताताई लाडे, माजी सभापती, न.प. गडचिरोली
७. अरविंद पाटील वासेकर, ज्येष्ठ नेते
८. विजयराव कावळे, माजी सभापती, न.प. गडचिरोली
९. दिलीप धात्रक, माजी नगरसेवक
१०. रामचंद्र वाढई, माजी नगरसेवक
११. रवींद्र किरमीरवार, माजी नगरसेवक
१२. गुलाब मडावी, माजी नगरसेवक
१३. हिमांशू देशमुख, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस
१४. ओमप्रकाश शर्मा, प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस
१५. संध्या उईके, माजी नगरसेविका
१६. मीनल चिमूरकर, माजी नगरसेविका
१७. अमीन जीवानी, माजी नगरसेवक
१८. जयंतराव येलमुले, ज्येष्ठ नेते
१९. प्रभाकर गेडाम, माजी नगरसेवक
२०. मजू पाटील नैताम, लांजेडा
२१. नामदेवराव बाणबले, विसापूर
२२. भास्कर निमजे, शहर उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
२३. अनिल निकुरे, सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस
२४. विमलताई भोयर, महिला जिल्हा उपाध्यक्ष
२५. सुनील चिमूरकर, जिल्हा उपाध्यक्ष, सामाजिक न्याय विभाग
२६. उमाजी गेडाम, सामाजिक कार्यकर्ते
२७. विवेक कांबळे, युवक शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
२८. श्रीकांत देशमुख, कार्यकर्ते
पक्ष प्रवेश यादी पाहण्यासाठी खालील निळी ओळ वर क्लिक करा.


