महाराष्ट्र

राज्यात ७ नोव्हेंबर ला “वंदे मातरम्” गीताचा १५० वा वर्धापन दिन

सर्व तालुक्यांत सामूहिक गानाचे आयोजन

मुंबई,प्रतिनिधी :-

राज्य शासनाच्या निर्देशानुसार येत्या ७ नोव्हेंबर २०२५ रोजी “वंदे मातरम्” या राष्ट्रभावनेने प्रेरित गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये सामूहिक गानाचे आयोजन करण्यात येणार आहे.

या गीताने भारतीय स्वातंत्र्यलढ्यात देशभावना जागृत करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याची नोंद शासनाने घेतली असून, त्याच स्मरणार्थ हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी सर्व अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे निर्देश दिले आहेत की, या कार्यक्रमाच्या वेळी सर्व शासकीय व निमशासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तालुक्याच्या ठिकाणी अनिवार्यपणे उपस्थित राहावे.

शासनाच्या सर्व विभागांतील अधिकारी व कर्मचारी यांच्या सहभागामुळे हा कार्यक्रम यशस्वी होईल आणि “वंदे मातरम्” गीताच्या माध्यमातून देशप्रेम, राष्ट्रीय एकता आणि अभिमानाची भावना अधिक दृढ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker