निवडणूक

गडचिरोली काँग्रेसला मोठा धक्का; शेकडो युवांचा भाजपात प्रवेश

गडचिरोली, प्रतिनिधी :-

देशाचे लोकप्रिय, दूरदर्शी आणि विकासाभिमुख नेतृत्व करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे कार्यकुशल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आज गडचिरोली येथे झालेल्या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला.

शहरातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सागर अरुण निंबोरकर यांनी काँग्रेसचा मोठा राजकीय आधार खिळखिळा करत शेकडो तरुण व महिला कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे भाजपात नव्या उर्जेचा संचार झाला आहे.

हा सोहळा शासकीय विश्रामगृह कॉम्प्लेक्स, गडचिरोली येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. उपेंद्र कोठेकर (विदर्भ संघटन मंत्री) होते. तर प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार व भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते उपस्थित होते.

या प्रसंगी आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, सहकार महर्षी प्रकाश पोरेड्डीवार, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, माजी आमदार कृष्णाभाऊ गजबे, रमेश भुरसे, गोविंद सारडा, प्रकाश गेडाम, गीताताई हिंगे, सदानंद कुथे, रविंद्र ओल्लालवार, प्रमोद पिपरे, योगिता पिपरे, मोतीभैया कुकरेजा, अनिल कुंघाडकर, सुधाकर येंगदलवार आदी मान्यवर उपस्थित होते.

“भाजपा म्हणजे राष्ट्रनिर्मितीचे आंदोलन” — डॉ. उपेंद्र कोठेकर

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. कोठेकर म्हणाले,

 “भारतीय जनता पक्ष हा केवळ राजकीय पक्ष नसून राष्ट्रनिर्मितीचे एक महान आंदोलन आहे. मोदीजी आणि फडणवीसजींच्या नेतृत्वात भारत आत्मनिर्भरतेकडे झेपावत आहे. गडचिरोलीतील या उत्साही पक्षप्रवेशामुळे भाजपा परिवार जनतेच्या विश्वासाशी अधिक घट्ट जोडला गेला आहे.”

विकासाचा ध्यास — भाजपाची जनसेवा नव्या जलद गतीनं

“सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास” या विकासधर्माला अनुसरून गडचिरोलीच्या सर्वांगीण प्रगतीला आता नवी उमेद आणि गती मिळणार असल्याचे मान्यवरांनी सांगितले.

या पक्षप्रवेशामुळे गडचिरोलीच्या राजकीय समीकरणात मोठे बदल घडण्याची शक्यता व्यक्त होत असून, भाजपाच्या विस्ताराचा हा एक नवा प्रभावी अध्याय ठरू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker