महाराष्ट्र

भाजी घ्या भाजी… ताजी भाजी… स्वस्त भाजी….. शाळेत आवाज दुमदुमला.

शाळेत बाल आनंद बाजार उत्साहात 

सांगली, प्रतिनिधी :

येथील मनपा शाळा क्रमांक ३६, विवेकानंद सोसायटी, कुपवाड रोड, सांगली शाळेमध्ये आनंददायी शनिवार उपक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांचा बाल आनंद बाजार व फूड फेस्टिवल उत्साहात संपन्न झाले.

या उपक्रमाचे उद्घाटन माजी नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विष्णू माने, माजी नगरसेविका कल्पना कोळेकर, प्रशासन अधिकारी रंगराव आठवले यांच्या हस्ते झाले.  यावेळी चंपावती कागे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी  कुपवाड शहर  अध्यक्ष सुनीता जगधने, जयश्री जाधव, अनिता जाधव, वासंती दुधाळ, शाळा व्यवस्थापन समितीमधील सदस्य  उपस्थित होते.

  शाळेतील विद्यार्थ्यांनी  भाजीपाला स्टॉल, फूड फेस्टिवल स्टॉल, ज्वेलरी, गोळ्या बिस्किटे, बेकरी प्रोडक्ट आदी प्रकारचे ५३ स्टॉल उभारले होते.  शाळा परिसरातील नागरिक व पालकांनी  विविध स्टॉलला भेट देऊन भाजीपाला व वस्तूंची खरेदी केली व फूड फेस्टिवल  खाऊ गल्लीचा मनमुराद आनंद घेतला. या उपक्रमातून मुलांना व्यवहारिक ज्ञान, नफा – तोटा याची माहिती होण्यास मदत झाली. स्व कमाईचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. खरेदी विक्री मधून एकूण उलाढाल ७५०० रुपयांची झाली. सदर उपक्रमाबद्दल पालकांनी कौतुक करून समाधान व्यक्त केले.  उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक शंकर ढेरे, शाहीन सनदी, अक्षता रेड्डी, मोनाली पवार, कविता चौगुले, रोहिणी रेणके आदींनी परिश्रम घेतले.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker