ताज्या घडामोडी

गोंडवाना विद्यापीठाचा १३ वा दीक्षांत समारंभ

गडचिरोली, प्रतिनिधी :-

गोंडवाना विद्यापीठाचा तेरावा दीक्षांत समारंभ बुधवार, दिनांक २१ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता गोंडवाना विद्यापीठाच्या नवीन सांस्कृतिक सभागृहात संपन्न होणार आहे.

या दीक्षांत समारंभाचे अध्यक्षस्थान कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे भूषविणार असून, सर्च (SEARCH), चातगाव, गडचिरोलीचे संस्थापक डॉ. अभय बंग हे प्रमुख पाहुणे म्हणून दीक्षांत भाषण करणार आहेत. तसेच या समारंभास गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

या समारंभात अधिसभा, व्यवस्थापन परिषद, विद्यापरिषद यांचे सन्माननीय सदस्य, दानदाते तसेच विद्यापीठातील विविध प्राधिकरणे, मंडळे व समित्यांचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

या दीक्षांत समारंभात विशेष गुणवत्ता व प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके, तसेच आचार्य पदवी, पदवी व पदव्युत्तर पदवी प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी केले आहे.

आचार्य पदवी वितरण

या दीक्षांत समारंभात एकूण ९६ विद्यार्थ्यांना आचार्य (पीएच.डी.) पदवी प्रदान करण्यात येणार असून त्यामध्ये —

मानव विज्ञान विद्याशाखा : ४३

विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा : ३४

वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा : १५

आंतरविद्याशाखीय विद्याशाखा : ४

विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

सर्वाधिक सुवर्णपदक मिळविणाऱ्या विद्यार्थिनी

वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतून नेवाजाबाई हितकरणी महाविद्यालय, ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) येथील वैष्णवी संजय थेरकर हिने तीन सुवर्णपदके, तर विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतून राष्ट्रपिता महात्मा गांधी आर्ट अँड सायन्स कॉलेज, नागभीड (जि. चंद्रपूर) येथील जादा रबिया रियाज हिनेही तीन सुवर्णपदके मिळवत सर्वाधिक सुवर्णपदकांचा मान पटकावला आहे.

विद्याशाखानिहाय सुवर्णपदके

मानव विज्ञान विद्याशाखा : २३

विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा : ८

वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा : ५

आंतरविद्याशाखीय विद्याशाखा : ३

या दीक्षांत समारंभात एकूण ३९ सुवर्ण व १ रजत असे ४० पदके प्रदान करण्यात येणार आहेत. तसेच SPARC (Social Programme on Addiction in Rural Community) या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना पदविका प्रदान करण्यात येणार आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker