ताज्या घडामोडी

देसाईगंज तालुका ग्राहक पंचायत कार्यकारिणी गठीत

देसाईगंज, प्रतिनिधी :-

ग्राहक जनजागृतीसाठी गडचिरोली जिल्ह्यात सर्व तालुका स्तरावर अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या कार्यकारिण्या गठीत करण्यात येत असून, त्याच अनुषंगाने देसाईगंज येथे तालुका कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली.

ही कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष उदय धकाते यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आली.

नवनियुक्त पदाधिकारी पुढीलप्रमाणे —

तालुकाध्यक्ष : श्री विलास ढोरे

उपाध्यक्ष : श्री विनायक गरफडे

सचिव : श्री महेशभाऊ झरकर

सहसचिव : श्री मनोज ढोरे

कोषाध्यक्ष : श्री उद्धव डाबरे

महिला प्रमुख : सौ. पूजा पुस्तोडे

सह महिला प्रमुख : सौ. वनिता अशोक नाकतोडे

विधी प्रमुख : ॲड. संजय गुरु

प्रचार प्रमुख : श्री बारई सर

सदस्य : श्री लोमेश्वर आंबेकर, सौ. आशा उईके, सौ. छाया विलास ढोरे

या वेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत, गडचिरोली जिल्हा सचिव श्री अरुण पोगळे, जिल्हा उपाध्यक्ष श्री विजयभाऊ साळवे, जिल्हा महिला प्रमुख सौ. सुचिता धकाते, सदस्या सौ. निलिमा देशमुख यांच्या उपस्थितीत कार्यकारिणी गठीत करण्यात आली.

मान्यवरांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत ग्राहक हक्कांचे संरक्षण, जनजागृती व शोषणाविरोधात जोमाने कार्य करण्याच्या सूचना दिल्या.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker