ताज्या घडामोडी

‘अखंड न्यायदर्पण’ वृत्तपत्राचे कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे यांच्या हस्ते विमोचन

 

गडचिरोली, प्रतिनिधी :—

गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे ‘अखंड न्यायदर्पण’ या नव्या वृत्तपत्राचे विमोचन मा. कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे यांनी ‘अखंड न्यायदर्पण’ वृत्तपत्राच्या प्रकाशनाबद्दल मुख्यसंपादक सचिन गुरुजी मेश्राम, संपादक प्रा. श्रीमंत सुरपाम तसेच संपूर्ण संपादकीय टीमचे अभिनंदन केले. पत्रकारिता ही समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम असून सत्य, न्याय आणि लोकहित जपणारी पत्रकारिता समाजासाठी अत्यंत आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले.

‘अखंड न्यायदर्पण’ हे वृत्तपत्र समाजात सकारात्मक विचार, न्यायनिष्ठ भूमिका आणि लोकशाही मूल्यांचा प्रसार करेल, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी या वृत्तपत्राच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

या विमोचन सोहळ्यास गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन, ‘अखंड न्यायदर्पण’चे संपादक प्रा. श्रीमंत सुरपाम, कैलाश शर्मा यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी, प्राध्यापक व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यसंपादक सचिन गुरुजी मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाशित होणाऱ्या या वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजात न्याय, सत्य व लोकशाही मूल्ये अधिक दृढ करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker