ज्येष्ठ शिक्षक शंकरराव पिपरे यांचे निधन

गडचिरोली, प्रतिनिधी :-
गडचिरोली येथील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ तथा वसंत विद्यालयाचे सेवा-निवृत्त शिक्षक श्री. शंकरराव बालाजी पिपरे यांचे मंगळवार, दि. 27 जानेवारी 2026 रोजी दुपारी 2 वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. निधनसमयी ते 90 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने गडचिरोली जिल्ह्यातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.
स्व. शंकरराव पिपरे यांनी आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात शेकडो विद्यार्थी घडवून शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. साधेपणा, शिस्तप्रियता, प्रामाणिकपणा आणि विद्यार्थ्यांविषयी असलेली आपुलकी ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ठळक वैशिष्ट्ये होती. एक आदर्श शिक्षक आणि संस्कारक्षम मार्गदर्शक म्हणून ते कायम स्मरणात राहतील.
त्यांच्या पश्चात पुत्र माजी नगरसेवक प्रमोद पिपरे, अनिल पिपरे, नातू अनुराग पिपरे, ऋषिकेश पिपरे, लोकेश पिपरे, सून नगरसेविका योगिता पिपरे (माजी नगराध्यक्ष, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष) तसेच आप्तेष्ट असा मोठा परिवार आहे.
त्यांची अंत्ययात्रा बुधवार, दि. 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 ते 12 वाजताच्या दरम्यान गडचिरोली येथील रेडी गोडाऊनजवळील निवासस्थानावरून निघणार असून वैनगंगा नदीच्या बोरमाडा स्मशान घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली असून विविध क्षेत्रातील मान्यवर, माजी विद्यार्थी व नागरिकांकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.



