अपघातताज्या घडामोडी

बारामती विमानतळावर एअर ट्रॅफिक यंत्रणा कार्यान्वित

मुंबई, प्रतिनिधी :-
बारामती येथे नुकत्याच घडलेल्या विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या विनंतीनंतर भारतीय हवाई दलाने तातडीने पावले उचलत बारामती विमानतळावर एअर ट्रॅफिक यंत्रणा बसवली आहे.
लोहगाव (पुणे) येथील भारतीय हवाई दलाच्या तंत्रज्ञ पथकाने ही अत्याधुनिक यंत्रणा विमानतळावर कार्यान्वित केली असून, त्यामुळे बारामती विमानतळावरील हवाई वाहतूक अधिक सुरक्षित, नियंत्रित आणि सुरळीत होण्यास मदत मिळणार आहे.
या यंत्रणेमुळे विमानांच्या उड्डाण व उतरणी दरम्यान आवश्यक समन्वय राखला जाणार असून भविष्यातील संभाव्य धोके टाळण्यासाठी ही व्यवस्था महत्त्वपूर्ण ठरणार आहे, अशी माहिती हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
विमान सुरक्षेच्या दृष्टीने ही यंत्रणा बसवणे हे महत्त्वाचे पाऊल मानले जात असून, बारामती विमानतळाच्या कार्यक्षमतेत यामुळे लक्षणीय वाढ होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker