आपला जिल्हा
गडचिरोलीत ३ जूनला जागतिक सायकल दिन चे आयोजन

गडचिरोली,प्रतिनिधी :-
सायकल स्नेही मंडळ गडचिरोलीच्या वतीने ३ जुन रोजी जागतिक सायकल दिनानिमित्त प्रथमच भव्य सायकल रैली चे आयोजन करण्यात आले आहे.
सायकल स्नेही मंडळातर्फे राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाविषयी नियोजन करण्याच्या हेतूने नुकतीच सभा आयोजित करण्यात आली होती.या सभेत ३ तारखेला “जागतिक सायकल दिन ” गडचिरोली शहरातील प्रमुख मार्गावरून (मार्ग इंदिरा गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय परत गांधी चौकातील रेस्ट हाऊस येथे समारोप) सकाळी ६ वाजता काढण्यात येणार आहे.
जागतिक सायकल दिवस हा एक जागतिक दिवस आहे. दुचाकी सायकल ही वापरण्यास आणि विकत घेण्यास सोपी आणि स्वस्त असा वाहन पर्याय आहे. त्यामुळे सर्वाँना सामावून घेणारे जागतिक स्तरावरील वाहन म्हणून सायकल कदे पाहणे याबद्दल हा दिवस साजरा करण्याचे ठरविले गेले. एप्रिल २०१८ मध्ये संयुक्त राष्ट्र समितीने ३ जून हा दिवस विश्व सायकल दिवस म्हणून निश्चित केला
समाजातील कोणत्याही स्तरातील व्यक्तींना सायकल चालविण्याचा आनंद घेता यावा यासाठी या दिवशी विशेष सायकल यात्रा आयोजित केल्या जातात. सायकल हे वाहन सहिष्णुता, मानवता यांचे प्रतीक आहे असा संदेश यातून पोहोचविण्याचा प्रयत्न केला जातो. आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी सायकल चालविणे उपयुक्त आहे असा संदेश यानिमित्ताने दिला जातो. यासाठी विविध उपक्रम आयोजित केले जातात.



