गडचिरोली, प्रतिनिधी :-
शहर स्वच्छतेला चालना देण्यासाठी लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडने CSR उपक्रमांतर्गत गडचिरोली नगर परिषदेला अत्याधुनिक स्वयंचलित रस्ते स्वच्छता वाहन प्रदान केले. या वाहनामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांची स्वच्छता अधिक जलद व प्रभावी होऊन धूळ प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. वाहनाचे संचालन व देखभाल कंपनीच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे.
या वाहनाचे उद्घाटन गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. मिलिंद नारोटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी खासदार अशोक नेते, नगर परिषदेचे उपाध्यक्ष निखिल चारडे, आरोग्य व स्वच्छता समितीचे सभापती मुक्तेश्वर कटवे तसेच मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर उपस्थित होते. तसेच ल्लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे वरिष्ठ अधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते.
कंपनीच्या प्रतिनिधींनी विविध CSR उपक्रमांची माहिती देत पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण व पर्यावरण संवर्धनासाठी कंपनीची वचनबद्धता व्यक्त केली. व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांच्या नेतृत्वामुळे जिल्ह्यात विकास उपक्रमांना गती मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले. उपस्थित मान्यवरांनी नागरिकांनी स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.
Back to top button