ताज्या घडामोडीदेश विदेश

सरला महेश्वरी यांचे निधन; प्रसारण क्षेत्रातील एक युग संपले

नवी दिल्ली, प्रतिनिधी :-

दूरदर्शनच्या माजी वृत्तनिवेदिका सरला महेश्वरी यांचे काल निधन झाले. त्या ७१ वर्षांच्या होत्या. दूरदर्शनच्या प्रारंभीच्या काळात आपल्या प्रभावी निवेदनशैलीमुळे लोकप्रिय झालेल्या निवेदिकांमध्ये त्यांचा प्रमुख समावेश होता.

१९८० च्या दशकात सौम्य आवाज, शुद्ध उच्चार आणि साध्या पण प्रभावी व्यक्तिमत्त्वातून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर वेगळी छाप निर्माण केली होती. देशात जेव्हा दूरदर्शन हीच एकमेव वृत्तवाहिनी होती, त्या काळात घरोघरी पोहोचलेल्या विश्वासार्ह वृत्तनिवेदकांमध्ये त्यांचे नाव आदराने घेतले जात होते.

माजी वृतनिवेदका सरला माहेश्वरी

देशातील पत्रकारांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या जाण्याने प्रसारण आणि पत्रकारिता क्षेत्रातील एक महत्त्वाचा आवाज कायमचा हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker