ताज्या घडामोडी

भामरागडच्या अतिदुर्गम बिनागुंडा गावात नवीन पोलीस मदत केंद्र स्थापन

गडचिरोली, प्रतिनिधी :-

माओवाददृष्ट्या अतिसंवेदनशील भामरागड उपविभागातील अतिदुर्गम बिनागुंडा गावात आज (२४ जानेवारी २०२६) नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली. छत्तीसगड सीमेपासून अवघ्या ८ किमी अंतरावर असलेल्या या भागात सुरक्षा बळकट करण्यासाठी अवघ्या २४ तासांत हे केंद्र उभारण्यात आले.

सुमारे १०५० मनुष्यबळ, सी–६० कमांडो, बीडीडीएस पथक, सीआरपीएफ व विशेष पोलीस दलाच्या मदतीने हे मदत केंद्र उभे करण्यात आले. या केंद्रामुळे अतिदुर्गम भागातील नागरिकांपर्यंत प्रशासन पोहोचण्यास मदत होणार असून विकासाच्या मुख्य प्रवाहात गावांचा समावेश होणार असल्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.

या पोलीस मदत केंद्राचे उद्घाटन विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, डीआयजी अंकित गोयल, पोलीस अधीक्षक नीलोत्पल व सीआरपीएफ कमांडंट शंभु कुमार यांच्या उपस्थितीत पार पडले.

नवीन केंद्रामुळे परिसरातील राष्ट्रीय महामार्ग, मोबाईल टॉवर, पूल व दळणवळणाच्या रखडलेल्या कामांना गती मिळणार असून स्थानिक नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. सन २०२३ पासून सुरक्षा पोकळी कमी करण्याच्या मोहिमेतील हे १० वे पोलीस मदत केंद्र ठरले आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker