आपला जिल्हाक्राईमताज्या घडामोडी
गडचिरोलीत उधारीच्या पैशांच्या वादातून युवकाची भरदिवसा हत्या

गडचिरोली, प्रतिनिधी :-
शहरातील लांझेडा परिसरात उधारीच्या पैशांच्या वादातून एका युवकाची भरदिवसा हत्या झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी सुमारे पाच वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून जिल्हा मुख्यालयातच घडलेल्या या प्रकारामुळे कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
या घटनेत सचिन कुडुलवार (रा. विवेकानंदनगर, गडचिरोली) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव असल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लांझेडा परिसरातील काही आरोपी फर्निचरचे काम करतात. मृतक सचिन कुडुलवार यांनी त्यांना काही रक्कम उधारीने दिली होती.




