महाराष्ट्रसामाजीक

लग्न मंडपात घरगुती गॅसचा वापर; कॅटरर्सकडून सहा सिलेंडर जप्त, गुन्हा दाखल

चंद्रपूर, प्रतिनिधी :-

घरगुती गॅस सिलेंडरचा अवैधरीत्या व्यावसायिक वापर करणाऱ्या कॅटरर्स व्यावसायिकावर पुरवठा विभागाच्या भरारी पथकाने कारवाई केली. लग्न मंडपात धाड टाकून सहा घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले असून संबंधित कॅटरर्स मालकाविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई चंद्रपूर शहरातील दाताळा मार्गावरील रामसेतू पुलाजवळ असलेल्या साईराम ग्रीन फार्म मंगल कार्यालयात करण्यात आली. येथे सुरू असलेल्या कार्यक्रमात घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करून स्वयंपाक केला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पुरवठा विभागाच्या पथकाने अचानक धाड टाकली.

या कारवाईदरम्यान सहा घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले. याप्रकरणी कॅटरर्स व्यावसायिक विनोद लखन चौधरी (वय ४२) यांच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पुरवठा विभागाच्या या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांवर पुढील काळातही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker